धुरंधर; 22 वर्षीय युवकाने कट केला ट्रेलर-टीझर, यामी गौतमशी खास नातं, जाणून घ्या कोण आहे तो? – Tezzbuzz

सध्या ‘धुरंधर’ ही बहुचर्चित अ‍ॅक्शन फिल्म प्रचंड गाजत आहे. फक्त तीन दिवसांत 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. वीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल असे दिग्गज कलाकार असलेल्या या चित्रपटाच्या यशामागे एक 22 वर्षांचा तरुण विशेष चर्चेत आहे- ओजस गौतम. कारण, धुरंधर’चा दमदार ट्रेलर आणि टीझर याच ओजसने एडिट केला आहे.

5 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांना पहिल्याच दिवसापासून खिळवून ठेवले. कंटेंटसोबतच ट्रेलरची एडिटिंगही उद्योगात उच्च दर्जाची मानली जात आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांनी स्वतः ओजसच्या कामाचं कौतुक केलं. ओजस हा आदित्य धर (Aditya Dhar)यांचा म्हैवणा आणि अभिनेत्री यामी गौतमचा भाऊ आहे. ट्रेलरप्रेमी प्रेक्षकांनी त्याच्या कामाचा भरभरून गौरव केला आहे.

ट्रेलर लॉन्चच्या वेळी आदित्य धर यांनी सांगितले की, आपल्या सगळ्यांनी ट्रेलर आणि टीझर आवडल्याचे पाहून आनंद झाला. या उत्कृष्ट कट्समागे २२ वर्षांचा ओजस आहे. फक्त दोन ते अडीच मिनिटांत तो अशी एडिटिंग करतो की कथा उघडही होत नाही आणि उत्सुकताही वाढते.” जेव्हा ओजस स्टेजवर यायला संकोच करत होता, तेव्हा रणवीर सिंह स्वतः त्याला घेऊन आले, असा किस्साही यावेळी चर्चेत आला.

ओजसच्या कौशल्याबद्दल पुढे बोलताना आदित्य धर म्हणाले, ओजस माझ्याजवळ 2021 पासून आहे. ‘अश्वत्थामा’च्या काळातील प्रत्येक संघर्षात तो माझ्यासोबत होता. ‘धुरंधर’ घडण्यामागे त्याच्या हट्टाचा आणि मेहनतीचा मोठा वाटा आहे. मला खात्री आहे—पुढील दहा वर्षांत हा देशातील सर्वात मोठ्या दिग्दर्शकांपैकी एक बनेल.तरुण वयातच अशा मोठ्या प्रोजेक्टला भारदस्त ओळख देणाऱ्या ओजस गौतमकडे आता संपूर्ण इंडस्ट्रीचे लक्ष लागले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

तन्वी द ग्रेट’ला आंतरराष्ट्रीय मान्यता; शुभांगी दत्तला मिळाला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा सन्मान

Comments are closed.