रश्मिका-विजयच्या लग्नाला पूर्ण झाला एक महिना, खास पोस्टच्या कॅप्शनने जिंकली चाहत्यांची मनं – Tezzbuzz
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघेजण साउथ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहे. तर या दोघांनी 26 फेब्रुवारी रोजी लग्न केले. हे लग्न उदयपूर मध्ये परिवार आणि मित्र यांच्या उपस्थितीत पार पडले, आणि त्याच्या या लग्नकार्याला ‘वेरोश असे नाव देण्यात आले होते. तर नंतर चित्रपट सृष्टीतील सहकलाकारांना रिसेप्शन देण्यात आले होते. तर आता त्याच्या लग्नाला 1 महिना पुर्ण झाला आहे. तर त्या निमित्ताने आता या जोडप्यानी लग्नातील काही खास क्षणांचे फोटो केले शेअर आहेत.
रश्मिका मंदाना आणि विजय (vijay)देवरकोंडा या जोडप्याची पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पडद्यामागे काम करणाऱ्या महिलांचे मनापासून सर्वाचे आभार मानले आहेत. या महत्त्वाच्या टप्प्यावर विचार व्यक्त करताना, विजयने फोटोंसोबत एक भावनिक टीप लिहिली आहे, ज्यामध्ये त्याने आयुष्यातील सुंदर क्षण आणि त्यांच्याशी निगडित आठवणींच्या महत्त्वाविषयी सांगितले आहे. त्याने लिहिले, एक महिना झाला आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात मोठे क्षण येतात. आपण सर्वजण कधी ना कधी त्या क्षणांपर्यंत पोहोचतो आणि त्यांचा सामना करतो. बघता बघता आपण त्यातून बाहेर पडलेलो असतो. पण जर तुम्ही ते क्षण योग्य प्रकारे जगलात, तर त्या आठवणी तुमच्यासोबत कायम राहतील, तुम्हाला आणि तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकाला आनंद देतील, आणि मला नेहमी हेच हवं असतं.”
विजय देवराकोंडा पुढे म्हणाला, मला त्या काही महिलांप्रति माझे प्रेम व्यक्त करायचे आहे, ज्यांनी माझा आणि माझ्या सभोवतालच्या प्रत्येकाचा लग्नाचा अनुभव सर्वात आनंददायी बनवला. त्याने आपला सोहळा अविस्मरणीय बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या सर्वांचे आभार ज्याची सुरुवात त्याच्या ज्वेलरी डिझायनरपासून झाली. तो म्हणाला, “माझी ज्वेलरी डिझायनर अर्पिता येथील टीम, माझी मैत्रीण ऐश्वर्या – प्रत्येकाला ICY सारखी मैत्रीण मिळायलाच हवी. ती खरंच एक वरदान आहे. मी तिला न विचारताही, ज्या क्षणी मी लग्न करायचे ठरवले, त्या क्षणापासून ती आमच्यासोबत होती. “आमची प्लॅनर, प्रिया – प्रिया आमच्यासोबत प्लॅनर म्हणून सामील झाली, तिने हि आमच्यासाठी खुप केले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
संजय दत्त अभिनीत ‘आखिरी सवाल’ या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
Comments are closed.