8 एपिसोडची या स्पाय थ्रिलर सीरिजचा, 8.6 रेटिंगसह ओटीटीवर आहे 6 वर्षांपासून कायम दबदबा – Tezzbuzz

आज-काल ओटीटी कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण ओटीटीवर नवनवीन कन्टेन्ट तसेच घरबसल्या अनेक प्रकारच्या सिरीज मालिका चित्रपट पाहू शकतो. पण या कंटेंट यामध्येही अनेक प्रकार आहेत, स्पाय-थ्रिलर मालिका, एक्शन सिरीज, सस्पेन्स थ्रिलर मालिका चित्रपट यामधील सस्पेन्स थ्रिलर मालिका नेहमीच उत्कंठा आणि सस्पेन्समुळे प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवतात. आणि अशीच एक मालीका म्हणजे ‘स्पेशल ऑप्स’.

ही कथा एका सामान्य पोलीस तपासाची नसून, अनेक दशकांपासून पडद्यामागे उलगडत गेलेल्या एका गुप्त मोहिमेची आहे. या मालिकेचा प्रत्येक भाग अत्यंत खिळवून ठेवणारा आहे 2020 मध्ये, जेव्हा जग आपल्या घरातच बंदिस्त होते, तेव्हा दिग्दर्शक नीरज पांडे यांनी एक अशी उत्कृष्ट मालिका सादर केली, जिने स्पाय-थ्रिलर चाहत्यांची मने जिंकली. आम्ही ‘स्पेशल ऑप्स’बद्दल बोलत आहोत. या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे तिची कथा, जी 2001 मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी जोडलेली आहे. ही कथा ‘रॉ’ एजंट हिम्मत सिंगभोवती फिरते, जो गेल्या 19 वर्षांपासून एका सूत्रधार दहशतवाद्याचा शोध घेत आहे, ज्याचे अस्तित्व सरकारी फायलींमध्ये केवळ एक सिद्धांत मानले जाते.

या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते के के (k k)मेनन यांनी साकारलेली हिम्मत सिंगची भूमिका त्यांच्या संयम आणि बुद्धिमत्तेच्या संगमामुळे प्रशंसनीय आहे. त्यांच्यासोबत करण टॅकर, विनय पाठक, मेहेर विज आणि सैयामी खेर यांसारख्या कलाकारांनी आपापल्या भूमिकां उत्तमपणे साकारले आहेत. आणि तसेच या मालिकेमुळे अनेक यातील कलाकरांना ओळख मिळाली आहे. यामुळेच या मालिकेला IMDb वर 10 पैकी 8.6 असे प्रभावी रेटिंग मिळाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

विवियन डिसेनाने दोन महिन्यांनंतर केले पुनरागमन, दुसऱ्या बाळाच्या आनंदाची दिली खुशखबर

Comments are closed.