‘द राजा साब’ चित्रपटाची रिलीज डेट फिक्स, निर्मात्यांनी केली पुष्टी – Tezzbuzz

नुकताच तेजा सज्जाच्या ‘मिरे’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान, चित्रपटाचे निर्माते विश्व प्रसाद यांनी तेजच्या (Prabhas) आगामी बहुप्रतिक्षित हॉरर कॉमेडी चित्रपट ‘द राजा साब’ ची नवीन रिलीज तारीख जाहीर केली आहे.

प्रभासचा नवीन चित्रपट ‘द राजा साब’ ९ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्माते टीजी विश्व प्रसाद यांनी ‘मिरे’च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात याची पुष्टी केली आहे. हा चित्रपट संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ‘द राजा साब’ चित्रपटाची निर्मिती टीजी विश्व प्रसाद, विवेक कुचीबोटला आणि ईशान सक्सेना यांनी केली आहे.

‘द राजा साब’ हा चित्रपट मारुती दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटात मालविका मोहनन, निधी अग्रवाल आणि रिद्धी कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संजय दत्त देखील एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हा एक मोठ्या बजेटचा हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे, ज्याचे संगीत थमन यांनी दिले आहे. चिरंजीवीचा ‘मन शंकर वर प्रसाद गरू’ आणि ‘अनागनागा ओका रोजू’ सोबत विजयचा ‘जन नायकन’ हे चित्रपट संक्रांतीला प्रदर्शित होणार आहेत. या सर्व चित्रपटांमध्ये कडक स्पर्धा असेल.

‘द राजा साब’ या रोमँटिक हॉरर कॉमेडी चित्रपटाव्यतिरिक्त, दक्षिण अभिनेता प्रभास संदीप रेड्डी वांगा यांच्या कॉप ड्रामा चित्रपट ‘स्पिरिट’ आणि दिग्दर्शक हनु राघवपुडी यांच्या ‘फौजी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटांव्यतिरिक्त, प्रभास ‘सलार: पार्ट २’ आणि ‘कलकी २८९८ एडी’ च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘पति पत्नी और वो 2’च्या शूटिंगदरम्यान गोंधळ, प्रयागराजमध्ये कर्मचाऱ्यांना मारहाण

Comments are closed.