‘क्षमता असूनही त्याला सिनेमाची ऑफर येत नाही’; प्रिया बापटने नवऱ्याबाबत केली खंत व्यक्त – Tezzbuzz

मराठी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही एक अत्यंत अभ्यासू आणि हुशार अभिनेत्री आहे. तरी देखील आजकाल मराठी चित्रपटांमध्ये तिचा वावर अगदीच कमी दिसतो. प्रिया सध्या हिंदी इंडस्ट्रीमध्ये जास्त सक्रिय असते. मराठी इंडस्ट्री मध्ये देखील प्रिया आणि उमेशचे नाटकाची काही प्रयोग चालू असतात. परंतु मराठी सिनेमांमध्ये तिला संधी मिळत नाही. खास करून आजकाल प्रिया हिंदी सिनेमा तसेच वेबसिरीजमध्ये जास्त दिसते. याबाबत तिला मराठी चित्रपटात काम का करत नाही? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तिने 2018 नंतर तिला मराठी सिनेमाची ऑफर आली नाही. असे तिने सांगितले. तसेच आता उमेशला देखील मराठी सिनेमांमध्ये फारशी संधी मिळत नाही, अशी खंत तिने व्यक्त केलेली आहे.

सोशल मीडियावर प्रिया आणि उमेश हे नेहमी सक्रिय असतात. त्यामुळे ही जोडी प्रेक्षकांची अगदी लाडकी जोडी बनलेली आहे. परंतु अलीकडे पाच-सहा वर्षात या दोघांचेही फारसे मराठी चित्रपट आलेले दिसलेले नाही. नुकतेच प्रिया बापटने एक मुलाखत दिली. याबाबत प्रिया बापट म्हणाली की, “मी आणि उमेश या विषयावर खूप बोलतो. उमेशचा आतापर्यंत प्रवास मी पाहिला आहे. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की, त्याला नाटक आणि मालिकेत जितक्या विश्वासाने पात्र दिली जात आहेत. तितक्या विश्वासाने सिनेमा दिला जात नाही. याचं कारण मला आजपर्यंत कधीच समजलं नाही. आता हे बोललं पाहिजे की नाही, मला माहित नाही. परंतु मराठी सिनेमातला तो सर्वात अंडररेटेड अभिनेता आहे. त्याने नाटकामध्ये काम करून एक वेगळा प्रेक्षक वर्ग जमावला आहे. मलाच काय तर इंडस्ट्रीज कोणालाही त्याच्या क्षमतेवर शंका नसेल. तो खूप ताकदीचा अभिनेता आहे. पण कोण जाणे तो सिनेमात अंडररेटेड आहे. त्या प्रकारचे सिनेमा त्याला ऑफरच झाले नाही. तसे सिनेमे त्याला मिळतच नाही. आम्ही याबद्दल खूप चर्चा देखील करतो.”

यापुढे ती म्हणाली की, “मला वाटतं की हे माझ्या बाबत आहे.पण त्याच्यासोबत हे का होतंय? हे खूप दुर्दैव आहे. मेकरला उमेशला घेऊन सिनेमा का करायचा नाही. आपण मराठी इंडस्ट्रीला खूप आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नुसतं प्रेक्षक येत नाहीत असं म्हणून चालणार नाही. मराठीत प्रेक्षकांना महाराष्ट्रात इतर सिनेमाचेही पर्याय आहेत. त्याच्या तोडीचा मराठी सिनेमा जर आला, तर मराठी माणूस तो पाहिला जाईल तेच प्रेक्षक नाटकाबाबतही करत नाही. साउथ मध्ये सिनेमा ही संस्कृती आहे. तसं मराठीत नाटके संस्कृतीचा भाग आहे. प्रेक्षक त्यासाठीच येतो. अशाप्रकारे प्रिया बापटने उमेश आणि तिला मराठी इंडस्ट्रीमध्ये जास्त काम मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे फिट अँड फाईन फोटो; सोशल मीडियावर होतायेत व्हायरल
कुमार सानूची गर्लफ्रेंड कुनिका पुन्हा एकदा प्रकाशझोतात; पत्नीने फोडली होती गाडी…

Comments are closed.