‘नागिन 7’साठी प्रियंका चाहरची प्रचंड मेहनत; 12 तास सलग शूटिंग, फक्त 40 मिनिटांचीच झोप – Tezzbuzz

प्रियांका चहर एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ती आता ‘नागिन ७’ मध्ये भुमिका साकारुन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आणि हा सीजन संपल्यानंतर चाहते दिग्दर्शिका-नृत्यदिग्दर्शिका फराह खान प्रियांकाच्या घरी तिच्या लोकप्रिय व्लॉगसाठी येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. तर आता हि प्रतीक्षा संपली आहे. आणि ज्यात प्रियांकाने ‘नागिन 7’ स्वीकारण्याबद्दलच्या तिच्या सुरुवातीच्या संकोचाबद्दल आणि कामाबाबतचे अपडेट शेअर केले आहेत.

या व्लॉगदरम्यान प्रियांकाने (Priynka)खुलासा केला की, तिने सुरुवातीला ‘नागिन’ची भूमिका नाकारली होती. पण नंतर मला आठवण करून दिली, “एकता मॅडमने मला बिग बॉसच्या घरात नागिनची भूमिका दिली होती, आणि जेव्हा दिवाकर बॅनर्जी स्पर्धाकंची निवड करत होते, तेव्हा मला बाहेर काढण्यास आलं होत. कारण त्यांना मला दुसऱ्या कशासाठी तरी ठेवायचे होते. तसेच घरातून निघण्यापूर्वी, त्यांनी सर्वांना मिठी मारली. जेव्हा त्यांनी मला मिठी मारली, तेव्हा त्या हळूच म्हणाल्या, “ऐक, मी तुला लवकरच फोन करेन. तेव्हा मला अंदाज आला होता की, ते मला नागिन साठी फोन करतील.

तसेच ती पुढे म्हणाली की, मला असा शो करायचा होता. ज्या अधिक वास्तविकता आणि नैसर्गिकता असेल, त्यामुळे मी सरळ नकार दिला. त्यावेळेस मी अमेरीकेला जात होते. आणि त्यांचा त्यादरम्यान फोन आला. त्यावेळी मी त्यांना म्हणाली की, मी अजुन याबाबत विचार केली नाही. नंतर, कास्टिंग करणाऱ्या व्यक्तीने मला सांगितले की फोन कट झाल्यावर माझी संपूर्ण टीम घाबरली होती.”

पण नंतर तिने हि मालिका स्विकारली आणि ‘नागिन 7’ सोबतच, ‘बॅटलग्राउंड’ या रिॲलिटी शोमध्ये मार्गदर्शक 7 म्हणून काम करण्याचाही निर्णय घेतला. तिच्या व्यस्त वेळापत्रकाबद्दल बोलताना, तिने सांगितले की ती ‘नागिन’साठी महिन्यातून 26 दिवस शूटिंग करायची आणि दररोज 12-तासांची शिफ्ट करायची.

‘रामायण’साठी रणबीर कपूरने केली येवढे वर्ष कठोर तयारी, योग, ध्यान आणि पौराणिक ग्रंथांचा केला सखोल अभ्यास

Comments are closed.