निक जोनस-प्रीयंका चोपड़ा कॉन्सर्टपूर्वी गाण्यावर नाचताना वायरल, फॅन्स म्हणाले – “जीजू, आपला प्लेलिस्ट द्या” – Tezzbuzz

हॉलिवूड सिंगर निक जोनस आणि त्यांचे भाऊ गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकत असल्याचे पाहायला मिळत आहे. कधी ऋतिक रोशन-कियारा अडवाणीच्या ‘आवां जावां’ तर कधी रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटातील ‘शरारत’ या गाण्यावर जोनस ब्रदर्स झूमताना दिसले आहेत. आता या मस्तीमध्ये प्रियंका चोप्राही सहभागी झाली असून, कुटुंबाचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

निक जोनास (Nick Jonas)यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते, त्यांचे भाऊ आणि प्रियंका चोप्रा एकत्रितपणे 1980 च्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील सुपरहिट गाणे ‘आप जैसा कोई’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हा व्हिडिओ कोणत्याही शूट किंवा मोठ्या इव्हेंटचा नसून, कॉन्सर्टपूर्वीचा एक मजेदार क्षण असल्याचे निकने सांगितले आहे. त्याने या गाण्याला आपली “प्री-शो एनर्जी सॉन्ग” अशी खास ओळख दिली आहे. चाहत्यांनी या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

हे पहिल्यांदाच नाही की जोनस ब्रदर्स बॉलिवूड म्युझिकवर डान्स करताना दिसले आहेत. याआधी त्यांनी रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटातील ‘शरारत’ या गाण्यावर रील बनवली होती. त्या व्हिडिओवर रणवीर सिंगने मजेशीर प्रतिक्रिया दिली होती, ज्यावर निकनेही हलक्याफुलक्या अंदाजात उत्तर दिले होते. अलीकडेच निक जोनस ‘वॉर 2’ चित्रपटातील ‘आवां जावां’ गाण्यावरही थिरकताना दिसले होते.

दरम्यान, नुकतेच कपिल शर्मा शोमध्ये सहभागी झालेल्या प्रियंका चोप्राने निक जोनससोबतच्या नात्याबद्दल एक खास आणि रोमँटिक किस्सा शेअर केला. करवा चौथच्या दिवशी निकने तिला चंद्र दाखवण्यासाठी केलेली खास व्यवस्था तिने उघड केली. प्रियंकाने सांगितले की, एका वेळी निकचा स्टेडियममध्ये शो सुरू होता, हजारो लोक उपस्थित होते, पण ढगांमुळे चंद्र दिसत नव्हता.

प्रियंकाने पुढे सांगितले की, करवा चौथ खास करण्यासाठी निकने तिला थेट विमानात बसवून ढगांच्या वर नेले. तिथे जाऊन तिला चंद्रदर्शन झाले आणि तिने तिथेच आपला उपवास सोडला. हा किस्सा ऐकून प्रेक्षकांसह शोमधील कलाकारही आश्चर्यचकित झाले. यावर कपिल शर्माने मिश्कील अंदाजात, “फक्त व्रतच सोडला का?” असा प्रश्न विचारला. त्यावर प्रियंकाने हसत उत्तर दिले की, “नाही, मिठाईही खाल्ली” निक-प्रियंकाची ही केमिस्ट्री आणि बॉलिवूडप्रेम पाहून चाहते पुन्हा एकदा भारावून गेले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

जेम्स रैन्सोन: वयाच्या 46व्या वर्षी अभिनेत्याने संपवलं आयुष्य; ‘द वायर’ फेम जेम्स रैन्सोनच्या निधनाने हॉलिवूडमध्ये खळबळ

Comments are closed.