‘भागम भाग २’च्या शूटिंगवर राज शांडिल्य यांची मोठी अपडेट; एकता कपूरच्या लीगल नोटीसला दिल उत्तर – Tezzbuzz

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि परेश रावल यांच्या भागम भाग २ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. मात्र या चित्रपटावरून दिग्दर्शक राज शांडिल्य आणि निर्माती एकता कपूर यांच्यात कायदेशीर वाद निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. मार्चमध्ये शूटिंग सुरू होणार होते. पण या वादामुळे चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता याबाबत राज शांडिल्य यांनी स्वतः मोठी अपडेट दिली आहे.

राज शांडिल्याने २०१९ मध्ये एकता कपूरसोबत तीन चित्रपटांचा करार केला होता. पण नंतर दिग्दर्शकाने हा प्रकल्प सोडला, ज्यामुळे एकता कपूरने त्याला कायदेशीर नोटीस पाठवली. एकता कपूरकडून कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर, दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की त्यांना धमक्या आणि अविश्वासाचा सामना करावा लागत आहे.

आता व्हरायटी इंडियाच्या एका अहवालात राजने आपले विधान शेअर केले आहे. या वृत्तात राज यांच्या या प्रकरणावरील विधानाचा हवाला देत म्हटले आहे की, “माझ्या कराराच्या अधिकारांनुसार, मी बालाजी टेलिफिल्म्ससोबतचा माझा करार रद्द करण्याची नोटीस बजावली आहे. ही नोटीस बजावून दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. जर बालाजी टेलिफिल्म्सना असे वाटत असेल की त्यांच्याकडे या कराराला आव्हान देण्यासाठी ठोस कायदेशीर आधार आहे, तर ते न्यायालयात जाऊ शकले असते. अशी कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही. त्याऐवजी, आता जे समोर आले आहे ते प्रकरण वाढवण्याचा आणि खोटे गुन्हेगारी आरोप लावण्याचा प्रयत्न आहे.” हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत आणि कंपनीकडे या कराराला आव्हान देण्यासाठी कोणताही ठोस आधार नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना धमकावण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येतय.

तसंच पुढ म्हटल आहे की, “मला माझ्या कायदेशीर भूमिकेवर पूर्ण विश्वास आहे आणि योग्य कायदेशीर प्रक्रियेद्वारे अशा कोणत्याही आरोपांना उत्तर देईन. हे देखील स्पष्ट केले आहे की ‘भागम भाग २’ चित्रपटाचे वेळापत्रक वेळेवर आहे आणि हा प्रकल्प वेळापत्रकानुसारच सुरू राहील.

दरम्यान अक्षय कुमार आणि परेश रावल यांची भूमिका असलेला ‘भागम भाग 2’ हा 2006 मध्ये रिलीज झालेल्या ‘भागम भाग’चा सिक्वेल आहे. मात्र, यावेळी गोविंदाला चित्रपटातून वगळण्यात आले आहे. मनोज बाजपेयीने या चित्रपटात त्यांची जागा घेतली आहे. प्रियदर्शनने ‘भागम भाग’ दिग्दर्शित केला आहे, तर राज शांडिल्य ‘भागम भाग 2’ दिग्दर्शित करत आहे. या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होण्याची अपेक्षा होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

अ‍ॅस्पिरंट्स सीझन 3 ट्रेलर; पंचायत नंतर गाजलेली सिरीज आता नव्या सीजनसह येतीय परत

Comments are closed.