महाकाव्य श्री रामायण कथा’चा टीझर रीलीज, ‘कच्चा बदाम गर्ल’ला सीतेच्या भूमिकेत पाहून प्रेक्षक नाराज – Tezzbuzz

रामायण चित्रपट हा दिवाळीच्या दरम्यान रीलीज होत आहे. यात रणवीर कपुर रामाच्या भुमिकेत आणि साई पल्लवी सीताच्या भुमिकेत दिसणार आहे. नितेश तिवारी यांच्या 4000 कोटींच्या ‘रामायण’ चित्रवटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तर आता ‘रामायण’ प्रदर्शनासाठी सज्ज असतानाच, रामायणावर आधारित आणखी एक चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. आणि या चित्रपटाचे नाव ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ आहे. ज्या मध्ये देव शर्मा श्री रामाची आणि अंजली अरोरा सीतेची भुमिकेत दिसणार आहे. मात्र या चित्रपटातील स्टार कास्ट निवडीवर प्रेक्षक नाराज आहेत.

या चित्रटपटाच्या निर्मात्यांनी नुकताच महाकाव्य श्री रामायण कथाचा टीझर रिलीज केला आहे. टिझरच्या सुरुवातीला सातिच्या स्वयंवरचे सीन घेतले आहे. ज्यात राम सीतेला पुष्हार घालताना दिसतात. यानंतर राम, लक्ष्मण आणि सीता वनवासासाठी नीघतात. सीतेच्या अपहरणाची दृश्ये दाखवली आहेत. मग राम आणि सीतेच्या विरहाची दृश्ये दाखवली जातात, आणि शेवटी संवाद आहे.

मात्र एक गोष्ट अशी आहे, ती म्हणजे अंजली अरोरा (arora)टीझरमध्ये माता सीतेची भूमिका साकारताना दिसत आहे. तीने या आधी ‘कच्चा बदाम गर्ल’ म्हणून एका गाण्यामुळे प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे माता सीतेच्या भुमिकेत पाहायला मिळणार.. आणि त्यासाठी चित्रपटातील या तिच्या निवडीमुळे अनेक लोक नाराज झाले आहेत. आणि ही एवढीच गोष्ट नाही तर प्रेक्षकांना टिझरमध्ये एक चुक सापडली आहे. “कृष्णाय वासुदेवाय हराये…” हा मंत्र ऐकू येतो आणि प्रभू रामानंतर आलेल्या श्रीकृष्णाचा रामायणात कसा वापर केला जाऊ शकतो, असा प्रश्न लोकांना पडला आहे. आता या गोष्टीवर प्रेक्षकांनी कंमेड केल्या आहे. निर्माते एवढी मोठी चुक अशी करु शकतात.. असे प्रेक्षकांना प्रश्न पडले आहेत.

हेही वाचा

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, झोया अख्तर यांनी दिली खास अपडेट

Comments are closed.