‘रामायण’साठी रणबीर कपूरने केली येवढे वर्ष कठोर तयारी, योग, ध्यान आणि पौराणिक ग्रंथांचा केला सखोल अभ्यास – Tezzbuzz

‘रामायण’ हा चित्रपट या वर्षातील एक बहुप्रतिक्षीत चित्रपट आहे. ही नितेश तिवारी दिग्दर्शित चित्रपट असुन यात अनेक लोकप्रिय कलाकार पाहायला मिळणार आहेत. तर यात प्रमुख भुमिकेत रणबीर कपूर, सुपरस्टार यश,(yash) दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माता नमित मल्होत्रा यांचा समावेश आहे. तसेच या चित्रपटांचे 2 भाग असणार आहेत. आणि पहिला भाग हा दिवीळी 2026 मध्ये रिलीज करण्यात येणार असुन दुसरा भाग 2027 मध्ये येणार आहे.

तर या चित्रपटाची टिम सॅन दिएगो कॉमिक-कॉन 2026 मध्ये जागतिक स्तरावर एकत्र आले होते. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमादरम्यान, संपूर्ण टीमने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अनेक महत्त्वाच्या पैलूंवर मनमोकळेपणाने चर्चा केली.

या प्रसंगी संभाषणादरम्यान, रणबीर कपूरने प्रभू रामाचे पवित्र आणि गहन पात्र साकारले असुन त्याला यासाठी काय तयारी करवी लागली हे त्याने स्पष्ट केले आहे. त्याने सांगितले की, पात्राची सखोल समज मिळवण्यासाठी त्याने दोन वर्षे योगाभ्यास केला आणि पौराणिक ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. त्याने अनेक धार्मिक विद्वान आणि अभ्यासकांकडून मार्गदर्शनही घेतले. तसेच तो पुढे म्हणाला की, “माझे गुरू सुवीर माझ्यासोबत तासनतास ध्यान करत असत, जेणेकरून मी प्रभू रामांच्या शिकवणी आणि विचारांच्या अधिक जवळ जाऊ शकेन. या प्रशिक्षनादरम्यान आम्ही प्रत्येक गोष्टींंचा बारकाईने आभ्यास केला होता.

या दरम्यान निर्मात्यांनी चित्रपटाबाबतही अपडेट सांगितले आहेत. निर्मात्यांनी जाहीर केले की ‘रामायण’चा ट्रेलर आता एका नवीन तारखेला जगभरात एकाच वेळी प्रदर्शित केला जाईल. तसेच त्यांनी एका निवेदनात म्हणले की, जेव्हा हा चित्रपट रीलीज होईल तेव्हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या 100 वर्षांहून अधिकच्या इतिहासात हा एक अभिमानाचा क्षण असेल.

“मी राहाला हा चित्रपट दाखवण्यासाठी उत्सुक आहे,” अमेरिकेत ‘रामायण’च्या ट्रेलर लाँच रणबीर कपूरचे वक्तव्य

Comments are closed.