1200 कोटी बजेटच्या सिनेमात रणबीर कपूरचा अनोखा लुक, सहा दिवसात अजून एक सरप्राईज होणार उघड – Tezzbuzz
2026 मधील प्रदर्शित होणाऱ्या एका चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट म्हणजे रामायण. हा चित्रपट भव्य स्वरूपात तयार होत आहे. तसेच यामध्ये उत्तम अशी स्टारकास्ट आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित हा चित्रपट असणार आहे. निर्माते नमित मल्होत्रा यांनी 27 मार्च रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी एक मोठी माहिती उघड केली आहे.
निर्माते नमित मल्होत्रा ही पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले, “रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा, ही कथा आपल्या सर्वांची आहे आणि आपले स्वतःचे रामायण त्याच्या खऱ्या भावनेने, वैभवाने प्रामाणिकपणे जिवंत करण्यासाठी आम्ही उचललेले प्रत्येक पाऊल पूर्ण जबाबदारी, आदर आणि समर्पणाने आहे. 2 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर ‘राम’चा पुढील लूक सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत. या निमित्ताने आम्ही आमच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ चाहत्यांसमोर एका भव्य जागतिक अनावरणाच्या माध्यमातून सादर करणार आहोत.
गेल्या 5000 वर्षांच्या काळात घडलेली आणि अब्जावधी लोकांकडून पूजनीय मानली जाणारी रामायण ही केवळ एक दंतकथा नाही, तर पिढ्यानपिढ्या स्मरणात राहणारा एक शाश्वत वारसा आहे. तर रामायण (ramayan)या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, रॉकिंग स्टार यश शक्तिशाली रावणाच्या भूमिकेत, सनी देओल पराक्रमी हनुमानाच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत असणार आहे. तर रामायण हा दोन भागांचा चित्रपट जगभरात आयमॅक्समध्ये प्रदर्शित होईल, ज्याचा पहिला भाग दिवाळी 2026 ला आणि दुसरा भाग दिवाळी 2027 ला प्रदर्शित होईल.
Comments are closed.