करण जोहरने राणी मुखर्जीला दिल खास सरप्राईज; लेकी आदिराचं पत्र पाहून राणीचे अश्रू अनावर – Tezzbuzz
बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी 22 जानेवारी रोजी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात चित्रपट निर्माता करण जोहर आणि माध्यमांशी मनमोकळा संवाद साधला. ‘मर्दानी 3’च्या प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या राणीने बॉलीवूडमधील आपल्या 30 वर्षांच्या प्रवासाबद्दल अनुभव शेअर केले. या कार्यक्रमादरम्यान एक अत्यंत भावूक क्षण पाहायला मिळाला, जेव्हा राणीला तिच्या 10 वर्षांच्या मुलीने—आदिराने—स्वतःच्या हाताने लिहिलेलं पत्र मिळालं. हा खास सरप्राईज तिचा जिवलग मित्र करण जोहरने दिल.
या कार्यक्रमातील राणीचे (Rani)अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातील एक व्हिडीओ विशेष चर्चेत आहे, ज्यात राणी पत्र वाचताना भावुक होताना दिसते. हे पत्र करण जोहरने मोठ्याने वाचून दाखवले. आई म्हणून राणीचं कौतुक करत आदिराने तिच्या आवडणाऱ्या गुणांचा उल्लेख केल्यामुळे राणी अक्षरशः अश्रूंनी भरून आली.
आदिराने पत्रात लिहिलं, “सर्वात आधी मला एवढंच सांगायचं आहे की मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तू जगातील सर्वात चांगली आई आहेस. आपण एकत्र खूप आठवणी शेअर केल्या आहेत—आनंदी, दुःखी आणि मजेशीर क्षणही. तुझ्या काही गोष्टी मला खूप आवडतात, काही नाही; आणि काही सवयी मला तुझ्याकडून मिळाल्या आहेत.”
पत्रात पुढे आदिराने नमूद केलं की अभिनय, नृत्य आणि पेंटिंगसारख्या कौशल्यांचा वारसा तिला आईकडून मिळाला आहे. तसंच, राणीचा राग ही सवय आवडत नसली तरी तीही आईकडूनच मिळाल्याचं तिने मजेशीर शैलीत लिहिलं. “आपण काही बाबतीत वेगळ्या आहोत—तुला गडद रंग आवडतात, मला पेस्टल; पण तरीही आपण खूप बाबतीत सारख्या आहोत—आपली दिसणं, सवयी आणि स्किल्स. मी मोठी झाल्यावर तुझ्यासारखी दयाळू, आत्मविश्वासू, प्रेमळ, समजूतदार आणि स्टायलिश व्हायचं आहे,” असंही तिने लिहिलं.
पत्राच्या शेवटी आदिराने लिहिलं, “या सगळ्यापलीकडे, आपण एकाच रक्ताच्या आहोत… आपण आई-मुलगी आहोत आणि आपलं नातं कायम असंच राहील. आय लव्ह यू, मम्मा.” हे शब्द ऐकताच राणी भावुक झाली.
राणी मुखर्जी आणि चित्रपट निर्माता आदित्य चोपड़ा यांनी 9 डिसेंबर 2015 रोजी मुलगी आदिराचं स्वागत केलं होतं. राणी नेहमीच आपल्या मुलीला लाईमलाइट आणि सोशल मीडियापासून दूर ठेवते. दरम्यान, ‘मर्दानी 3’ हा चित्रपट 30 जानेवारी रोजी प्रदर्शित होत असून, त्यात राणी मुखर्जीसोबत मल्लिका प्रसाद आणि जानकी बोडीवाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिराज मीनावाला यांनी केलं आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
सांगलीतील निर्मात्याचा आरोप; संगीतकार पलाश मुच्छलवर 40 लाखांची फसवणूक केल्याचा दावा
Comments are closed.