शूटिंगवेळी समुद्रात बुडून प्रसिद्ध अभिनेता राहुल बॅनर्जीचं निधन – Tezzbuzz
राहुल अरुणोदय बॅनर्जी हा एक प्रसिद्ध बंगाली अभिनेता आहे. तर यांच्या बाबत एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. हि घटना म्हणजे यांच्या आकस्मिक निधन झाले आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार आणि संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. ओडिशामधील तालसारी समुद्रकिनाऱ्यावर बुडून या अभिनेत्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना दिघा येथील एका रुग्णालयात नेण्यात आले होते. पण नंतर त्याला तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. प्राप्त माहितीनुसार, पश्चिम बंगाल पोलिसांनी या घटनेचा घटनाक्रम समजून घेण्यासाठी ओडिसा पोलिसांशी संपर्क साधला आहे. दिघा पोलीस ठाण्यात ‘अनैसर्गिक मृत्यू’ची नोंदही करण्यात आली असून, अधिकारी राहुल यांच्या निर्मिती चमूतील सदस्य आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहेत.राज चक्रवर्ती दिग्दर्शित 2008 मधील ‘चिरोदिनी तुमी जे आमार’ या रोमँटिक चित्रपटाद्वारे राहुल यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.
एक पुरुष नाव (rahul)यांची पत्नी, प्रियांका सरकार यांनी सोशल मीडियावर एका भावूक संदेशाद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत. या कठीण काळात त्यांनी एकांतात राखण्याची विनंती केली. त्यांनी नमूद केले की, त्यांचे कुटुंब सध्या अतिशय वेदनांतून जात आहे आणि या दुःखाचा सामना करण्यासाठी त्यांना काहीसा वेळ व मोकळीक मिळणे गरजेचे आहे. आपल्या संदेशात त्यांनी या गोष्टीवर विशेष भर दिला की, एक लहान मूल, एक आई आणि इतर आप्तजन या दुर्दैवी घटनेचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी त्यांच्या खासगीपणाचा आणि मर्यादांचा आदर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
धुरंधर 2मुळे 37 वर्षांपूर्वीचं गाणं पुन्हा चर्चेत, यासाठी मूळ गायिकेने मानले आभार
Comments are closed.