सलमान खानच्या वाढदिवसादिवशी चाहत्यांना सरप्राइज, ‘बॅटल ऑफ गलवान’च्या टीझरशी आहे खास कनेक्शन – Tezzbuzz

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान २७ डिसेंबर २०२५ रोजी आपला वाढदिवस साजरा करणार असून, याच दिवशी तो चाहत्यांसाठी एक मोठी भेट घेऊन येणार असल्याची चर्चा आहे. सलमानच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’ संदर्भात एक महत्त्वाची अपडेट याच दिवशी जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

सलमान खानचा (Salman Khan) वाढदिवस नेहमीच चाहत्यांसाठी खास असतो. मात्र यंदा हा दिवस आणखी खास ठरणार आहे, कारण त्याच्या आगामी चित्रपटाशी संबंधित मोठा खुलासा यावेळी होण्याची शक्यता आहे.वाढदिवशी प्रदर्शित होणार ‘बॅटल ऑफ गलवान’चा टीझर?

मिळालेल्या माहितीनुसार, ‘बॅटल ऑफ गलवान’चा टीझर २७ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ४ वाजेदरम्यान प्रदर्शित केला जाऊ शकतो. हा टीझर बऱ्याच काळापासून चर्चेत असून, सलमान खानच्या चाहत्यांना त्याची आतुरतेने प्रतीक्षा आहे.

“सलमान खान आपल्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट देण्याच्या तयारीत आहे. ‘बॅटल ऑफ गलवान’बाबत एक महत्त्वाचा भाग या दिवशी समोर येईल. निर्माते दुपारी २ ते ४ या वेळेत टीझर किंवा विशेष व्हिडीओ रिलीज करण्याचा विचार करत आहेत.”

‘बॅटल ऑफ गलवान’ : भारतीय जवानांच्या शौर्याची कथा – अपूर्व लाखिया दिग्दर्शित ‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट शौर्य, बलिदान आणि धैर्य यांची प्रेरणादायी कथा सांगणारा असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात घडलेल्या ऐतिहासिक संघर्षावर आधारित आहे.

या संघर्षात भारतीय जवानांनी चिनी लिबरेशन आर्मीच्या सैनिकांचा सामना केला होता. विशेष बाब म्हणजे ही लढाई कोणत्याही बंदुका किंवा गोळीबाराशिवाय, काठ्या आणि दगडांच्या सहाय्याने झाली होती. या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. या चित्रपटात चित्रांगदा सिंग महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्स अंतर्गत करण्यात येत आहे.

चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला – सलमान खानचा वाढदिवस, त्यावर ‘बॅटल ऑफ गलवान’चा टीझर — या दोन्ही गोष्टींमुळे सोशल मीडियावर प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. आता २७ डिसेंबरला नेमकी कोणती घोषणा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

कृति सेननने नुपूर–स्टेबिनचं नातं कन्फर्म केलं का? ख्रिसमसला सेनन कुटुंबासोबत दिसला गायक; पाहा फोटो

Comments are closed.