सलमान खानचे गाजलेले डायलॉग, जे आजही चाहत्यांच्या काळजात घर करून आहेत – Tezzbuzz

बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक असलेला सलमान खान आज आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. काल रात्रीपासून पनवेल येथील त्याच्या फार्महाऊसवर भव्य पार्टीला सुरुवात झाली असून अनेक नामवंत कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. दरम्यान, सलमानच्या (Salman)चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्या गाजलेल्या चित्रपटांमधील संवाद शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या निमित्ताने सलमान खानचे असे काही संवाद पाहूया, जे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मैं रिक्वेस्ट नहीं करता.. – २००३ साली प्रदर्शित झालेला तेरे नाम हा चित्रपट सलमान खानच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. या चित्रपटात त्याने राधे मोहन ही भूमिका साकारली होती. प्रेमात वेडावलेला, पण नंतर आयुष्यातील मोठ्या धक्क्यामुळे मानसिक रुग्णालयात जाणारा राधे प्रेक्षकांच्या मनात खोलवर उतरला. या चित्रपटातील हा संवाद आजही चाहत्यांच्या ओठांवर आहे.

दोस्ती का उसूल..नो सॉरी नो थैंक्यू.. – ९०च्या दशकातील सुपरहिट चित्रपट मैने प्यार किया मधील हा संवाद आजही तितकाच लोकप्रिय आहे. या चित्रपटातून सलमान खान खऱ्या अर्थाने स्टार झाला. त्याची रोमँटिक प्रतिमा याच चित्रपटामुळे तयार झाली आणि आजही हा संवाद मैत्रीचं प्रतीक मानला जातो.

एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी.. -२००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या वॉन्टेड चित्रपटाने सलमान खानला ‘दबंग’ इमेज दिली. गुप्त पोलिसाच्या भूमिकेत असलेल्या सलमानचा हा संवाद त्याचा ट्रेडमार्क बनला. आजही स्टेज शो, रील्स आणि मीम्समध्ये हा डायलॉग मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
मुझ पर एक एहसान करना.. – २०११ मधील सुपरहिट चित्रपट बॉडीगार्ड मधील हा संवाद प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिला. करीना कपूर आणि हेजल कीचसोबत सलमान खानने साकारलेला ‘लवली सिंग’ प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. हा संवाद आजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतो.
मैं दिल में आता हूं समझ में नहीं.. – २०१४ मध्ये आलेल्या किक चित्रपटात सलमान खान देवीलाल सिंग उर्फ डेव्हिलच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटातील हा संवाद तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय ठरला. आजही इंस्टाग्राम रील्स आणि व्हिडिओंमध्ये हा डायलॉग मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

सलमान खानचे हे संवाद केवळ शब्द नाहीत, तर त्याच्या स्टारडमची ओळख आहेत. ६० व्या वाढदिवसानिमित्त चाहते त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत हे डायलॉग शेअर करत आहेत. वयाची ६० वर्षे पूर्ण करूनही सलमान खानची क्रेझ अजूनही तितकीच कायम असून तो आजही लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

निळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये मिथिला पालकरचा सुंदर लुक; एकदा नजर टाकाच

Comments are closed.