सीक्रेट वेडिंगनंतर राज निदिमोरूची समंथाला खास भेट; ननंद शीतलची भावनिक पोस्ट चर्चेत – Tezzbuzz
1 डिसेंबर 2025 रोजी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)आणि दिग्दर्शक-निर्माता राज निदिमोरू यांनी अत्यंत शांतपणे, कुटुंबीयांच्या उपस्थितीत एका खाजगी समारंभात लग्न केले. दोघांच्या नात्याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होती, परंतु त्यांनी कधीही या अफेअरबद्दल सार्वजनिकरित्या बोलले नव्हते. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या लग्नाने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छांचा वर्षाव झाला.
लग्नानंतर राजने समंथासाठी एक अनोखी आणि भावनिक भेट तयार ठेवली होती. त्याने हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथे एक सुंदर, आलिशान घर तिला लग्नाची भेट म्हणून दिले. आधुनिक सुविधांनी युक्त हे घर पाहून समंथा अत्यंत आनंदित झाली. तिच्यासाठी हे घर फक्त एक भेट नसून नव्या आयुष्याची सुरुवात दर्शवणारी एक खास आठवण ठरली आहे.
लग्नानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले. राजची बहीण शीतल निदिमोरू हिने समंथासाठी एक भावनिक कविता शेअर केली. तिने लिहिले, “प्रत्येकाला असे प्रेम मिळो, जे शांत, स्थिर आणि परिपूर्ण जाणवेल.” समंथानेही ही पोस्ट आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत शीतलचे मनापासून आभार मानले.
समंथ आणि राज यांचे हे दुसरे लग्न आहे. समंथाचे पहिले लग्न अभिनेता नागा चैतन्य सोबत 2017 मध्ये झाले. काही काळ सुखाने संसार केल्यानंतर मतभेद निर्माण झाले आणि 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. राजचे पहिले लग्न श्यामली डे सोबत झाले होते, परंतु 2022 मध्ये ते दोघे विभक्त झाले.
आता समंथा आणि राज दोघेही नव्या प्रवासाची सुरुवात करत आहेत. त्यांच्या या निर्णयाचे चाहते, मित्र आणि बॉलिवूड-टॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी स्वागत केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
Comments are closed.