भारतात शांतता नाही, या वक्तव्यावर वाद वाढताच संजय दत्तने दिले हे स्पष्टीकरण – Tezzbuzz

संजय दत्त हा एक बाॅलिवुड मधील लोकप्रिय कलाकार आहे. तसेच तो त्याच्या चित्रपटामुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र काहि दिवसांपासुन तो त्याच्या काही वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने अलीकडेच शेखर सुमन यांच्या शेखर टुनाईट या शोमध्ये सहभागी झालेला दिसला. जिथे त्याने दिशातील परिस्थीवर भाष्य केले. गांधी जयंतीच्या दिवशी प्रसारीत झालेल्या एका भागात अभिनेत्याने म्हणले की, मला भारतात पुर्वीसारखी शांतता जाणवत नाही. त्याचे हे वाक्य आता व्हायरल होत आहे. आणि त्यामुळे वाद निर्माण झाले आहे. आणि यावर आता संजय दत्त यांनी एका पोस्ट मधुन त्यांच्या या वादावर उत्तर दिले आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय (sanjay)म्हटले आहे की, तो जे काही बोलला ते गांधीगिरीच्या संदर्भात होते आणि ते स्क्रिप्टेड होते. त्याने आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे की, कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्याचा हेतू नव्हता. किंवा कोणत्याही समुदाय, संस्थेच्या भावना दुखवण्याचा हेतु नव्हता मी जे काही बोललो ते आधीपासुनच ठरलेले होते आणि त्या संभाषणाचा उद्देश फक्त तेथील वातावरण हलकाफुलका करण्यासाठी होता.

खरं पाहिला गेलं तर शो दरम्यान संडय दत्तला एक अशी परिस्थिती देण्यात आली होती, जिथे त्याला स्वत:ला देशाचा पंतप्रधान समजुन पाच मिनिटे बोलायचे होते. आणि या दरम्यान त्याने मुन्नाभाई शैलीत एक हास्यत्मक भाष्य केले ते या वेळी म्हणाले की या देशात खुप प्रेमळ लोक आहेत. येथे शांतता असायला हवी मला आता आपल्या देशात पुर्वीसारखी शांतता जाणवत नाही. आणि आधीचे शांततेचे दिवस परत यावेत.

हेही वाचा

विद्या बालन १७ वर्षांनंतर आर. बाल्कींसोबत करणार काम; नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

Comments are closed.