श्रध्दा कपुरने ईठाच्या जी जी रे जी गाण्यासाठी गिरवले लावणीचे धडे, या व्यक्तीने शेअर केला BTSव्हिडिओ – Tezzbuzz

ईठा काही दिवसांतच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असुन, प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी खुप उत्सुक आहेत. तसेच या चित्रपटातील गाण रिलीज झालं असुन याच दरम्यान श्रध्दा कपुरचा या गाण्याच्या डान्स मागचा परिश्रमाचा व्हिडिओ समोर आला आहे. नृत्यदिग्दर्शिका वैभवी मर्चटने नुकताच जी जी रे जी या गाण्याच्या चित्रकरणादरम्यानचा एक पडद्यामागील व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये श्रद्धाच्या आगामी बायोपिकसाठीच्या लावणी नृत्याच्या तालमीची आणि सादरीकरणाची झलक पाहायला मिळत आहे.

वैभवी मर्चटने इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सेटवर हे उत्तम डान्स कश्या प्रकारे तयार केले आहे हे दाखवण्यात आले आहे. या क्लिपमध्ये नृत्यदिग्दर्शक श्रध्दा आणि नर्तकांच्या गटाला पारंपरिक नृत्यशैली शिकवताना दिसत आहेत, ज्यात ते योग्य हावभाव नृत्याच्या मुद्रा आणि पदचाली समजावुन सांगत आहेत.

वैभवीने हे गाणे आणि व्हडिओ शेअर करत म्हणले आहे. की प्रत्येक गाण्याच्या नृत्य पावलांमागे एक कहाणी असते आणि हे त्या क्षणांपैकी काही आहेत, आणि याला जी जी रे जी या गाण्याने खास बनवले आहे. हे क्षण माझ्यासोबत कायम राहेल तर या व्हिडीओ ला कमेंट करत तु अप्रतिम आहेत असे म्हणले आहे.

श्रध्दा कपूर (Kapoor)अभिनीत “ईठा” हा चित्रपट प्रसिद्ध मराठी लोककलाकार विठाबाई भाऊ मंग नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे.  लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि दिनेश विजन, लक्ष्मण उतेकर व करिश्मा शर्मा निर्मित ‘ईठा’ हा चित्रपट 4 डिसेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

हेही वाचा
रामायण चित्रपटाचा बॅाक्स ऑफिसवर धुमाकुळ, 14 दिवसांत कमाई 1500 कोटींच्या पार

Comments are closed.