राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलेल्या ‘श्रीकांत’वर शरद केळकरने व्यक्त केली भावनिक प्रतिक्रिया – Tezzbuzz
72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा हा नुकताच पार पडला आहे. त्यात अनेक जणांना वेगवेगळ्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आणि या मध्ये ‘श्रीकांत’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ज्यामध्ये राजकुमार राव यांनी उत्तम अभिनय केला होता. तसेच अनेक उत्तम कलाकांनी यात काम केले आहे. तसेच या चित्रपटात काम केलेल्या शरद केळकरने एका मुलाखती दरम्यान चित्रपटाबाबतचा आंनद आणि अभिमान व्यक्त केला आहे.
या चित्रपटांत शरदने रवी मंथा नाव असणाऱ्या एका व्यावसायिकाची भुमिका साकारली आहे. जो केवळ श्रीकांतचा गुंतवणूकदारच नाही, तर प्रत्येक वळणावर त्याच्या पाठीशी उभा राहणारा त्याचा सर्वात मोठा मार्गदर्शक आणि मित्रही होता. तसेच शरद ला त्याच्या दमदार आवाजामुळे आणि व्यक्तीमत्तावामुळे उत्तम सामिजिक संदेश भुमिका करायला आवडतात. मात्र त्याने सांगितले की हा माझ्यासाठी एक भावनिक अनुभव होता. आणि हा चित्रपट असा संदेश देतो की इच्छाशक्ती असेल तर सर्व काही सिध्द होत.
शरद (sharad) केळकर या सन्मानांवर बोलताना म्हणाला की, काही चित्रपट हे अभिमानासाठी बनवले जातात, तर काही कथा का सांगितल्या पाहिजेत या कारणासाठी बनवले जातात. जेव्हा तुषार हिरानंदानी आमच्याकडे कथा घेउन आले आणि आम्ही या कथेला कसा उत्तम पणे सादर करु आणि तसच तेव्हा ती आम्ही पुरस्कारांसाठी बनवली नाही तर श्रीकांत बोला यांच्या अविश्वसनीय धैर्याला न्याय देणे हेच आमचे एकमेव ध्येय होते. हा राष्ट्रीय पुरस्कार खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या असलेल्या कथांसाठी एक मोठी ओळख आणि सन्मान आहे.
हेही वाचा
‘ही आंदोलनाची पद्धत किळसवाणी’, CJP प्रोटेस्टवरील व्हायरल व्हिडिओंवर कंगना नाराज
Comments are closed.