आमच्या भावनांशी खेळू नका’, श्रद्धा कपूरने केले ‘धुरंधर’चे रिव्ह्यू; पार्ट 2 बद्दल व्यक्त केली उत्सुकता – Tezzbuzz
रणवीर सिंग अभिनीत ‘धुरंधर’ सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत असून चित्रपटाला प्रेक्षकांसह सेलिब्रिटींचेही भरभरून प्रेम मिळत आहे. अक्षय कुमार, विकी कौशल, हृतिक रोशन, अल्लू अर्जुन आणि समांथा रूथ प्रभू यांच्यानंतर आता बॉलिवूडची ‘स्त्री’ श्रद्धा कपूरनेही चित्रपटाचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, श्रद्धाने ‘धुरंधर’च्या दुसऱ्या भागाबद्दल आपली उत्सुकता व्यक्त करत दिग्दर्शक आदित्य धर यांना तो लवकर प्रदर्शित करण्याचे आवाहन केले आहे.
श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor)इंस्टाग्रामवर चित्रपटाबाबत अनेक स्टोरीज शेअर केल्या. एका स्टोरीत तिने लिहिले, “आदित्य धरने ‘धुरंधर’ बनवल्याबद्दल मला खरोखर राग येतो, कारण आता दुसऱ्या भागासाठी तीन महिने वाट पाहावी लागणार आहे. आमच्या भावनांशी खेळू नका, कृपया तो लवकर प्रदर्शित करा.” चित्रपटाचा अनुभव शेअर करताना श्रद्धा म्हणाली, “हा अनुभव अप्रतिम होता. आज सकाळी शूटिंग नसते, तर मी हा चित्रपट पुन्हा पाहायला गेले असते.” यंदाच्या हिंदी सिनेसृष्टीतील हिट चित्रपटांचा उल्लेख करत तिने ‘छावा’, ‘सैयारा’ आणि ‘धुरंधर’ हे 2025 मधील महत्त्वाचे चित्रपट असल्याचेही नमूद केले.
याशिवाय, श्रद्धा कपूरने आदित्य धर यांची पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतम यांच्याबाबत सुरू असलेल्या नकारात्मक जनसंपर्कावरही भाष्य केले. ती म्हणाली, “यामी गौतमला नकारात्मक प्रसिद्धी आणि बनावट वादांचा सामना करावा लागला, मात्र ‘धुरंधर’ने या सगळ्यावर मात करत उत्तम कामगिरी केली. कोणतीही वाईट गोष्ट चांगल्या चित्रपटाला खाली आणू शकत नाही. आम्हाला प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास आहे.”
धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत अवघ्या 11 दिवसांत 379.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. देशासह जागतिक पातळीवरही हा स्पाय-थ्रिलर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.
आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंगसोबत अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन, संजय दत्त आणि राकेश बेदी महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
हेल्मेटशिवाय बाईक चालवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोहेल खानने मागितली माफी, केली ही विनंती
Comments are closed.