अभिजीत भट्टाचार्यचा मुलगा दुबईत अडकला; गायकाने मागितली सरकारची मदत – Tezzbuzz

प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य (abhijeet Bhattacharya) यांनी सोशल मीडियावरून भारत सरकारकडे मदत मागितली आहे. कारण त्यांचा मुलगा सध्या दुबईमध्ये अडकला आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे त्याला तिथून बाहेर पडणं कठीण झालं आहे. त्यामुळे आपल्या मुलाला सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी त्यांनी सरकारकडे विनंती केली.

अभिजीत यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं होतं,“माझा मुलगा जय भट्टाचार्य सध्या दुबईमध्ये अडकला आहे. एक वडील म्हणून हा आमच्यासाठी खूपच काळजीचा आणि दुःखाचा काळ आहे. मी भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाला विनंती करतो की त्यांनी या परिस्थितीकडे लक्ष द्यावं आणि माझ्या मुलाला लवकरात लवकर सुरक्षितपणे भारतात आणावं.”
त्यांनी पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्रालयाला टॅग करत तात्काळ मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र काही वेळानंतर त्यांनी ही पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट केली.

अभिनेत्री ईशा गुप्ता ही सुद्धा काही दिवसांपूर्वी अबू धाबीमध्ये होती. पण ती सुरक्षितपणे भारतात परतली आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर तिने चाहत्यांचे आभार मानले. भारत-यूएई सरकार आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीमुळे ती सुखरूप परत आल्याचं तिने सांगितलं. गायक हनी सिंग देखील सध्या दुबईमध्येच आहे. त्याने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना सांगितलं,“आम्ही सुरक्षित आहोत आणि काम करत आहोत.” त्यामुळे त्याच्या चाहत्यांची थोडी चिंता कमी झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

प्रियांका चोप्राने अमेरिकेत साजरी केली होळी, पती निक जोनाससोबत सेलिब्रेशनची झलक केली शेअर

Comments are closed.