12 किलो वजन घटवल्यावर सोहेल खानचा खुलासा, नेमकं काय झालं घ्या जाणुन – Tezzbuzz

सोहेल खान हा एक उत्तम अभिनेता-निर्माता आहे. आणि आलिकडे तो त्याच्या चित्रपटासाठी नाही तर तो त्याच्या अती प्रमाणात वजन घट झाल्यामुळे चर्चेत आला आहे. जे ‘अलायन्स’ या रिॲलिटी शोच्या रॅप-अप पार्टीमध्ये स्पष्टपणे दिसून आले. की त्याचे वजन फारच कमी झाले आहे. आणि यामुळे चाहते आता काळजीत पडले आहेत. काहीना त्याच्या आरोग्याबाबत शंका होती. आणि काहींना त्याने ओझेम्पिकसारखी वजन कमी करण्यासाठी औषध घेतली आहेत का असा प्रश्न पडला होता. नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीत, सोहेलने या अफवा फेटाळुन खरे काय कारण आहे हे स्पष्ट केले आहे.

या अभिनेत्याने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, तो रिॲलिटी शोमध्ये पहिल्यांदाच सहभागी झाला होता. आणि पहिल्या काही दिवसांत मला थोडे अस्वस्थ आणि घुसमटल्यासारखे वाटल्याने आजरी पडला आणि त्याच दरम्यान त्याला पोटाचा संसर्ग झाला आणि त्यामुळे सर्वच गोष्ट अवघड होत गेल्या. तसेच त्याने पुढे सांगितले की, स्पर्धकांनी केवळ माझे आरोग्यच नाही, तर त्यांनी मला नेहमीच दाखवलेले प्रेम आणि काळजीही दाखवली. म्हणूनच, पहिल्या आठवड्यापासून आजारी असूनही, मी तिथे पाच आठवडे राहिलो.

या रियालिटी शो मध्ये त्याला त्याच्या आहारावर निंयत्रण ठेवावे लागले होते. तसेच त्याला या मधील टास्क पण पुर्ण करायचे होते. आणि या दरम्यान तो आजारी पडला त्यामुळे त्याच्या बाॅडी वर खुप प्ररीणाम झालेले दिसुन आला. अभिनेत्याने या दरम्यान झालेल्या मैत्री बाबात सांगितले. तो म्हणाला की, तिथे भेटलेल्या नवीन कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत त्याला शेवटच्या दिवसापर्यंत राहायचे आहे आणि ही नाती आयुष्यभर टिकतील अशी आशा आहे.

एका भागा दरम्यान सलमानने (slmaan)खुलासा केला की सोहेलने आधीच 12 किलो वजन कमी केले आहे.  अलीकडेच ‘द अलायन्स’ पार्टीमधील फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन समोर आले आहेत. त्यामुळे सोहेल नेमकं काय झाल आहे हे संमजल.

हेही वाचा

‘तुझ्याशिवाय आयुष्य खूप कंटाळवाणं झालं असतं…’; सैफ अली खानच्या वाढदिवसानिमित्त करीनाने दिल्या खास शुभेच्छा

Comments are closed.