इंडिगो स्टाफच्या बाजूने सोनू सूदची भूमिका; म्हणाले – स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघा – Tezzbuzz
इंडिगो एअरलाइन सध्या आपल्या सर्वात मोठ्या संकटातून जात असून, देशभरात उड्डाणे रद्द होणे आणि मोठ्या प्रमाणावर विलंब होण्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक विमानतळांवर परिस्थिती बसस्थानकासारखी झाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटींसह सामान्य नागरिकांनीही इंडिगोवरील असंतोष व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर समाजकार्यात नेहमीच पुढे असणारे अभिनेता सोनू सूद (Sonu Sood)यांनी एअरलाइन कर्मचार्यांचे समर्थन करत संतुलित प्रतिक्रिया दिली आहे.
सोनू सूद यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, उड्डाण उशिरा होणे नक्कीच त्रासदायक असतं. पण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहा, जे तुम्हाला वेळेत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कृपया इंडिगोच्या स्टाफशी नम्रपणे वागा. फ्लाइट कॅन्सलेशनचा सर्वात मोठा ताण याच कर्मचाऱ्यांवर असतो. कल्पना करा, तुम्ही त्यांच्या जागी असता तर?” असे म्हणत त्यांनी प्रवाशांना संयम बाळगण्याची विनंती केली. त्यांनी पुढे सांगितले की, विमानतळावर दिले जाणारे सर्व संदेश कर्मचारीही तुमच्यासारखेच ऐकत आहेत, त्यामुळे परिस्थिती समजून घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून सहकार्य करणे गरजेचे आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीला सोनू सूदांनी सांगितले की त्यांचा स्वतःचा परिवारही या गोंधळात अडकला. त्यांच्या फ्लाइटलाही विलंब झाला होता, पण शेवटी ते सुरक्षित पोहोचले. त्यामुळे त्यांचे म्हणणे आहे की समस्या समजून घेणे आणि जबाबदारीने वावरणे हे महत्त्वाचे आहे. ज्या प्रकारे काही जण चिडचिड करतात किंवा कर्मचाऱ्यांवर कमेंट्स करतात, ते टाळले पाहिजे, असे सोनूने सांगितले. तसेच लवकरच परिस्थिती सुधारेल आणि उड्डाणे पुन्हा सुरळीत होतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
गेल्या तीन दिवसांपासून देशभरात इंडिगोच्या अनेक उड्डाणांना मोठ्या प्रमाणावर विलंब होत आहे किंवा ती रद्द होत आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे आणि लोक सोशल मीडियावर एअरलाइनविरोधात संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, इंडिगोनेही स्थितीवर दु:ख व्यक्त करत प्रवाशांची माफी मागितली आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्ती, कलाकार आणि सामान्य प्रवासी या बिघाडाचा परिणाम भोगत असून परिस्थिती लवकर सुधारेल अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
Comments are closed.