करण जोहर पासून ते नागार्जुन पर्यंत, रश्मिका आणि विजयच्या रिसेप्शनला स्टार्सनी लावली हजेरी – Tezzbuzz

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघे चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत. हे दोघेजण आता लग्नबंधनात अडकले आहेत, तर त्यांच्या या लग्नाला त्यांनी एक नाव दिले होते ते म्हणजे “विरोश”. तर वेडिंगच ठिकाण अगदी शाही पद्धतीचं होत उदयपूरच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हे ठिकाण होत. तर रश्मिका आणि विजय यांनी मंगळवारी हैदराबादमध्ये चाहत्यांच्या मेजवानीचे आयोजन केले होते. आणि 4 मार्च रोजी हैदराबादमध्ये एक भव्य स्वागत समारंभ पार पडला.

रश्मिकाआणि विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये केवळ चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीच नव्हे तर देशातील प्रमुख राजकीय व्यक्तींनाही आमंत्रित केले होते. या जोडप्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना वैयक्तिकरित्या आमंत्रित केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही त्यांच्या रिसेप्शनमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि त्यांची पत्नी गीता रेड्डी यांनाही विजय आणि रश्मिका यांनी आनंदात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते.

रश्मिका आणि विजय (Vijay)यांच्या रिसेप्शनला अनेक बॉलिवूड स्टार्सनीही हजेरी लावली. चित्रपट निर्माते करण जोहर, ज्यांच्या चित्रपटातून विजय देवरकोंडाचे बॉलिवूड पदार्पण झाले होते, त्यांनीही या भव्य रिसेप्शनला हजेरी लावली. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत निर्मित “लायगर” या चित्रपटातून विजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात विजय देवरकोंडा यांच्यासोबत अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होती. मृणाल ठाकूर देखील तिच्या “द फॅमिली स्टार” चित्रपटातील सह-कलाकार विजय देवरकोंडासोबत आनंद साजरा करण्यात सहभागी झाली. नीना गुप्ता, कृती सॅनननेही रिसेप्शनला हजेरी लावली. ज्येष्ठ अभिनेत्री तिचा पती विवेक मेहरासोबत समारंभात पोहोचली होती.

या स्वागत समारंभाला दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील स्टार्स, काही राजकीय व्यक्ती उपस्थित होती. “पुष्पा” स्टार अल्लू अर्जुन देखील “श्रीवल्ली” मध्ये सामील झाले.  सुपरस्टार चिरंजीवी देखील नवविवाहित जोडप्यासोबत त्यांचा खास दिवस साजरा करण्यात सामील झाला. रवी तेजा आणि राम चरण यांनीही या खास कार्यक्रमाला हजेरी लावली. राम चरण त्याची पत्नी उपासनासोबत पोहोचला. नागार्जुन देखील त्याचा मुलगा नागा चैतन्य आणि त्याच्या पत्नीसोबत पोहोचला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर राजपाल यादवने सोडले मौन; म्हणाले, ‘मी कधीही म्हटले नाही की माझ्याकडे पैसे नाहीत’

Comments are closed.