कॉन्सर्टपूर्वी सुनिधी चौहान हिचा घसा बिघडला, आता 25 मार्च रोजी होणार कार्यक्रम – Tezzbuzz
सुनिधी चौहान ही बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आहे. तिच्या गाण्याने अनेक लोकांच्या मनात तिने घर निर्माण केले आहे. तर ती सध्या एका कारणामुळे चर्चेत आली आहे. ते म्हणजे 14 मार्च रोजी कलकत्ता येथे तिची कॉन्सर्ट सादर होणार होती मात्र अचानक तिची तब्येत आणि घसा खराब झाल्याने या कॉन्सर्ट ची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
कॉन्सर्टबाबत आयोजकांनी याबद्दल एक पोस्ट केली आहे. आणि कॉन्सर्ट आता 25 मार्च रोजी पुन्हा शेड्यूल करण्यात आला आहे, असे सांगितले. सुनिधी चौहान सध्या तिच्या “आय एम होम इंडिया टूर” वर आहे. तिने म्हटले आहे की तिचा घसा खूप दुखत आहे आणि तिचा आवाज कदाचित चांगला ऐकू येत नाही. तिची प्रकृती असूनही तिने गाण्याबद्दल चाहत्यांची माफी देखील मागितली. गुरुवारी, 12 मार्च रोजी सुनिधीने सोशल मीडियावर एक विधान शेअर केले, ज्यामध्ये स्पष्ट केले की तिच्या डॉक्टरांनी तिला घशाच्या गंभीर संसर्गामुळे पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता.
सुनिधी चौहानने तिच्या आवाजाने 700 हून अधिक चित्रपटांना शोभा दिली आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘उफ ये सियाप्पा’ चित्रपटात तिने एक गाणे गायले होते. तिने केसरी वीरमध्येही तिच्या गायनाचे प्रदर्शन केले होते. राजी, ये जवानी है दिवानी, ओमकारा आणि पुष्पा (Pusha)यांसारख्या चित्रपटांमध्ये तिच्या उत्कृष्ट गायनाने मने जिंकणारी सुनिधी चौहान सध्या संगीत दौऱ्यावर आहे. तिचा मधुर आवाज 25 मार्च रोजी कोलकातामध्ये परत घुमेलणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
Comments are closed.