रामानंद सागरांच्या ‘रामायण’मधील लक्ष्मणचा दावा, बराक ओबामा पण आहेत भगवान हनुमानचे भक्त – Tezzbuzz
भारताता दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. भगवान हनुमानाचे भक्त हा दिवस केसरीनंदन यांची जयंती म्हणून साजरा करतात. तर टेलिव्हिजन विश्वामध्ये अशा अनेक मालिका आहे ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. अशीच एक सिरीयल म्हणजे आहे म्हणजे रामायण दरम्यान, ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते सुनील लाहरी यांनी सर्व देशवासियांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या विशेष प्रसंगी, सुनील लाहरी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे. त्यामध्ये, त्यांनी असा दावा केला आहे की बराक ओबामा नेहमी भगवान हनुमानाला आपल्या हृदयात स्थान देतात.
सुनील (sunil)लाहरी यांनी व्हिडिओमध्ये, बजरंगबलीच्या नावाचा जप करत म्हणतात, “जय बजरंगबली, हनुमान जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या विशेष प्रसंगी मी गुरुवारी सकाळी संकट मोचन हनुमान मंदिराला भेट दिली. तिथे मी देश आणि जगाच्या सुखासाठी प्रार्थना केली.” तो पुढे म्हणाला, “मी सध्याच्या संकटांचा अंत व्हावा म्हणून प्रार्थना केली, कारण हनुमान हा एकमेव देव आहे जो सर्व समस्यांचे निवारण करतो. तो प्रत्येक समस्या सोडवतो. मला आशा आहे की माझ्या प्रार्थनेला उत्तर मिळेल.
सुनील लाहिरी हे रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या दूरदर्शन मालिकेतील लक्ष्मण या भूमिकेसाठी विशेष ओळखले जातात. त्यांनी ‘विक्रम और बेताल’, ‘लव कुश’, ‘परम वीर चक्र’ आणि ‘दादा-दादी की कहानियाँ’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
Comments are closed.