सनी देओलचा बदललेला लूक चर्चेत; ‘रामायण’ पूर्वी दिसला क्लीन-शेव अवतार – Tezzbuzz
अभिनेता सनी देओल हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. ‘पार्टिशन 1947’ मध्ये दिसणार आहे, तर ओटीटीवर ही ‘इक्का’ हा चित्रपट लवकरच धमाल करणार आहे. ‘इक्का’, एक कोर्टरूम ड्रामा, 10 जुलै रोजी नेटफ्लिक्स या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. तसेच सनी देओलच्या या चित्रपटाच प्रेक्षक खुप वाट पाहत आहेत. तर याच दरम्यान, सनी देओल त्याच्या नवीन लूकमुळेही तो चर्चेत आहे. त्याचे क्लीन-शेव्हन लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आणि हा नवीन लुक चाहत्याच्या चांगलाच पंसतीस उतरला आहे.
सनी (sunny)देओलच्या या क्लीन-शेव्हन लूक मधील एका चाहत्याने फोटो पोस्ट केले आहेत. आणि या फोटो वर चाहते आता प्रतिक्रिया देत आहेत. त्याने स्वेटर आणि हलक्या रंगाची डेनिम घातली असून, टोपी घालून आपला लूक पूर्ण केला आहे. त्याच्या या नवीन लूकवर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्याचा दाढी नसलेला लूक त्याच्या चाहत्यांना फारच आवडला आहे.
सनी देओलच्या लूकवर अनेक युझर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, काहींनी त्याचा संबंध नितेश तिवारीच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाशी जोडला आहे, तर काहींच्या मते तो या लूकमध्ये देखणा दिसत आहे. एकाने कमेंट केली, “‘रामायण’ची तयारी सुरू झाली आहे.” तर एकाने म्हणले आहे की, बजरंग बलीच्या लुक साठी एकदम रेडी आहेत.
सनी देओल अलीकडेच ‘बॉर्डर 2’ मध्ये दिसला होता, जो बॉक्स ऑफिसवर एक खरा उतरला. या चित्रपटाने जगभरात 464 कोटींहून अधिक कमाई केली. 23 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सनी देओलसोबत वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. भविष्यात सनी ‘इक्का’, ‘पार्टिशन 147’ आणि ‘रामायण’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनेता दिसणार आहे.
आमिर खान आणि गौरी स्प्रॅटचा विवाह संपन्न, डान्स करत साजरा झाला हा खास क्षण
Comments are closed.