विक्रम भट्टच्या आणखी एका प्रोजेक्टमध्ये सनी लिओनीची एन्ट्री, अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद – Tezzbuzz

सनी लिओनने (Sunny Leone) जिस्म २, रईस, तेरा इंतजार आणि एक पहेली लीला अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती वेब सिरीजमध्येही दिसली आहे. आज सोमवारी तिने एक पोस्ट शेअर केली आणि तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती दिली, ज्याचे शूटिंग सुरू झाले आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे यामध्ये ती दिग्दर्शक विक्रम भट्टसोबत काम करणार आहे.

सनी लिओनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती दिग्दर्शक विक्रम भट्टसोबत दिसत आहे. दोघांनीही हातात क्लॅपबोर्ड धरलेला दिसत आहे, ज्यावर लिहिले आहे, ‘विश्वासघात’. सनीने त्यासोबत कॅप्शन लिहिले आहे, ‘माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एकासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. चला काही जादू करूया’.

याआधी सनी लिओनीने विक्रम भट्टसोबत २०२२ मध्ये आलेल्या ‘अनामिका’ या वेब सिरीजमध्ये काम केले आहे. ही अ‍ॅक्शन-पॅक्ड स्पाय थ्रिलर वेब सिरीज एमएक्स प्लेअरवर उपलब्ध आहे. तिचे दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केले होते.

सनी आणि विक्रमच्या आगामी प्रोजेक्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते दोघांचेही अभिनंदन करत आहेत. सनी लिओनीच्या बॉलिवूड कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तिने २०१२ मध्ये जिस्म २ या चित्रपटातून पदार्पण केले होते. तथापि, २०११ मध्ये ‘बिग बॉस’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये दिसून तिने भारतात आपली ओळख निर्माण केली होती. सनीचे खरे नाव करणजीत कौर वोहरा होते, परंतु तिने प्रौढ उद्योगात काम करण्यासाठी तिचे नाव बदलून सनी लिओनी ठेवले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ साजरी करत आहे नंदामुरीच्या कारकिर्दीची ५० वर्षे

Comments are closed.