विजयची लेडी लक कोण? वाढदिवशीच निवडणूक जिंकत जुळलं नशिबाचं कनेक्शन – Tezzbuzz

थलपथी विजय हा एक दाक्षिणात्या लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक उत्तम चित्रपटाने दिले आहेत आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तर हा अभिनेता आता एका कारणामुळे आता चर्चेत आला आहे. तर हा अभिनेता राजकारणात उतरला असुन आता थलपथी विजय यांच्या ‘तामिळगा वेत्री कळघम’ पक्षाने दुपारी 1 वाजेपर्यंतच बहुमताच्या जादुई आकड्याच्या दिशेने भक्कम वाटचाल सुरू केली होती. आणि 4 मे हा दिवस तामिळनाडूच्या राजकारणातील एका ऐतिहासिक वळणाचा ठरला. तर आता लोक विजय यांच्या या भव्य विजयाचे श्रेय एका विशेष व्यक्तीच्या आशीर्वादाला देत आहेत. ज्यांनीही 4 मे रोजीच आपल्या आयुष्याच्या नव्या वर्षाची सुरुवात केली होती.

विजयचे (viajy)विजयाचे बातम्या सुरु असताच अभिनेत्री त्रिशा कृष्णन सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागल्या. वास्तविक पाहता, त्रिशा 4 मे रोजी आपला 43 वा वाढदिवस साजरा करतात. विजयचे ऐतिहासिक राजकीय यश आणि त्रिशाचा वाढदिवस एकाच दिवशी येणे, हा चाहत्यांसाठी एक फिल्मी योगायोगच आहे. या खास दिवशी, त्रिशाने देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी तिरुपती मंदिराला भेट दिली. चाहत्यांनी मंदिरातील फोटो आणि तिच्या चेहऱ्यावरील तेज यांचा थेट संबंध विजयच्या विजयाशी जोडला. त्रिशाने विजयला दिलेल्या वाढदिवसाच्या भेटीबद्दल इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू आहे आणि लोक याला त्रिशाचे ‘लेडी लक’ म्हणत आहेत.

विजय आणि त्रिशा हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. तर त्याच्या दोघात ही एक उत्तम मैत्री आहे. आणि काही दिवसापुर्वी विजय आणि त्याच्या पत्नीच्या वैयक्तिक मतभेदामुळे, त्रिशा आणि विजय या दोघांमध्ये काहीतरी आहे अशा अफवा पसरल्या होत्या मात्र अभिनेत्रीने यास मान्यता दिली नाही. मात्र आणि सार्वजनिक ठिकाणी ते एकत्र दिसतात त्यामुळे अशा अफवांना खतपाणी मिळते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘तुम्बाड 2’ या चित्रपटात होणार या लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री

Comments are closed.