केरळ स्टोरी 2; वादात अडकूनही द केरळ स्टोरी 2 ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ – Tezzbuzz

द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रचंड गाजल्यानंतर याचा सेकंड पार्ट नुकताच प्रदर्शन झाला आहे. द केरळ स्टोरी चित्रपट प्रदर्शनानंतर तेवढाच वादग्रस्तही राहिला होता. सेकंड पार्ट ही वादग्रस्त राहिला मात्र नियोजित तारखेला काल 27 फेब्रुवारी रोजी रिलीज झाला, द केरळ स्टोरी 2: गोज बियॉन्ड” हा चित्रपट केरळ उच्च न्यायालयाकडून मंजुरी मिळाल्यामुळे तो काल प्रदर्शित होवु शकला. उच्च न्यायालयाकडून काही कारणामुळे  स्थगिती दिली होती. तर निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी स्पष्ट केले की हा चित्रपट कोणत्याही राज्याला किंवा त्याच्या लोकांना लक्ष्य करत नाही.

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, “द केरळ स्टोरी 2: गोज बियॉन्ड” ने पहिल्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 35 दशलक्ष पेक्षा जास्त कमाई केली. जगभरात त्याने 41.5 दशलक्ष कमाई केली. आठवड्याच्या शेवटी चित्रपटाची कमाई वाढण्याची अपेक्षा आहे. चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर, कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट 28 कोटी असल्याचे वृत्त आहे.

पहिल्या दिवशी या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत “अस्सी” आणि “दो दीवाने सहर में” ला मागे टाकले. तापसी (tapsi)पन्नू अभिनीत कोर्टरूम ड्रामा “अस्सी” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 1 कोटींची कमाई करून आठ दिवसांतही 10 कोटींचा आकडा गाठू शकला नाही. चित्रपटाने आतापर्यंत फक्त 7.45 कोटींची कमाई केली आहे. सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर यांचा “दो दीवाने सहर में” हा चित्रपट 1.25 कोटींनी सुरू झाला आणि आतापर्यंत 6.8 कोटींची कमाई केली आहे.

द केरला स्टोरी 2 हा 2023 मध्ये सुदिप्तो सेन दिग्दर्शित द केरला स्टोरीचा दुसरा भाग आहे. तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या द केरला स्टोरीने 20 कोटींच्या बजेटमध्ये 300 कोटींहून अधिक कमाई केली आणि 8.3 कोटींची सुरुवात केली. ‘द केरळ स्टोरी 2’ हा चित्रपट कामाख्या नारायण सिंह यांनी दिग्दर्शित केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

सलमान खान-करीना कपूरसोबत काम केलेली अभिनेत्री हेजल कीच आता काय करते, घ्या जाणून

Comments are closed.