प्रभासच्या ‘द राजा साब’ ट्रेलर रिलीज; संजय दत्त नव्हे तर ६६ वर्षांची अभिनेत्री बनली कथेतली खरी जान – Tezzbuzz

सोमवार, २९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला प्रभासचा आगामी चित्रपटचा द राजा साब २.० चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मारुती दिग्दर्शित हा रोमँटिक हॉरर-कॉमेडी चित्रपट ९ जानेवारी २०२६ रोजी संक्रांती निमित्त प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटाची कथा प्रभासच्या पडद्यावरच्या आज्जीभोवती फिरते. ६६ वर्षीय जरीना वहाब प्रभासच्या आज्जीची भूमिका साकारताना दिसते, जी पूर्वी देवनगरची महाराणी गंगा देवी होती.

ट्रेलरमध्ये संजय दत्त (Sanjay Dutt)प्रभासच्या आजोबांची भूमिका साकारतो, जो मृत्यूनंतर एक वाईट शक्ती बनतो आणि माया महल किंवा हवेलीमध्ये त्याचा आत्मा राहतो. प्रभास त्याच्या आजोबांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हवेलीमध्ये प्रवेश करतो, पण त्याचाभोवती लपलेले धोक्याचे रहस्य त्याला समजत नाही. हवेलीमध्ये प्रवेश करताच, संजय दत्तचे पात्र त्याला ताब्यात घेतल्याचे दिसते आणि त्याच्या शक्तीने प्रभासला वश करण्याचा प्रयत्न करतो.

ट्रेलरमध्ये दाखवलेले दृश्य प्रेक्षकांना थक्क करणारे आहेत. प्रभास काही ठिकाणी हिप्नोटिस्टसारखा वागताना दिसतो, जिथे त्याचे केस पांढरे झालेले आहेत, तर दुसऱ्या दृश्यात तो डीसीच्या जोकरसारखा दिसतो. संजय दत्तच्या पात्रामागील रहस्य, माया महलातील चमत्कार, अनुत्तरीत प्रश्न आणि ट्विस्ट ट्रेलरमध्ये स्पष्टपणे उलगडले आहेत.

प्रभास आणि संजय दत्त यांच्यातील तीव्र स्पर्धा, हिप्नोटिक शक्तींचा संघर्ष आणि अनेक रहस्यमय वळणांनी ट्रेलर प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. ट्रेलरच्या शेवटी प्रभास जोकरसारख्या रुपात दिसतो, ज्यामुळे चित्रपटाच्या कथेतल्या ट्विस्ट आणि रहस्यांची उत्सुकता अधिक वाढते. द राजा साब २.० हा चित्रपट हिप्नोटिस्ट, आजी आणि माया महलातील शक्ती यांच्यातील संघर्षावर आधारित असून प्रेक्षकांना रोमांचक आणि मनोरंजक अनुभव देणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ने करण जोहरला केल प्रभावित, स्वतःच्या क्षमतेवर उभे केले प्रश्न – म्हणाले, ‘निर्माता म्हणून…’

Comments are closed.