‘370 रुपयांची बिर्याणी’ प्रकरण तापलं, महाराष्ट्रानंतर आता गुरुग्राममध्येही प्रणीत मोरे अडचणीत – Tezzbuzz
प्रणीत मोरे हा एक लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन आहे. आणि तो बिग बाॅस 19 चा माजी स्पर्धकही होता. या बिग बाॅस 19 नंतर त्याला प्रंचड ओळख मिळाली मात्र तो आता एका वादात अडकला आहे. ते म्हणजे तो त्याच्या एका शो दरम्यान त्याच्या मध्ये आलेल्या व्यक्तीने एका महिलेबाबत घानेरडे वक्तव्य केले आणि त्यामुळे प्रणित माेरे ही यामुळे सोशल मिडीयावर ट्रोल झाला. 370 बिर्याणी’ वादाने आता सोशल मीडियाच्या पलीकडे जाऊन कायदेशीर वळण घेतले आहे.
या वादामुळे प्रणीत मोरे याच्यावर महाराष्ट्रात एफआयआर दाखल झाल्यानंतर आता गुरुग्राममध्ये मोरे यांच्याविरुद्ध नवीन पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरे यांच्यासोबतच टेक प्रोफेशनल हिमांशू जांगरा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 370 बिर्याणी’च्या या वादामुळे महिलांबद्दलचा द्वेष आणि विनोदाच्या मर्यादा यांबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
हा वाद प्रणित मोरे (more)यांच्या एका शोदरम्यान सुरू झाला जेव्हा प्रेक्षकांमधील जांगरा या व्यक्तीने सांगितले की, एका ‘डेट’दरम्यान त्याने चिकन बिर्याणीवर एका मुलीसाठी 370 रु खर्च केले होते. जेव्हा त्या महिलेने त्याला नंतर घरी सोडण्यास सांगितले, तेव्हा त्याने त्या बदल्यात शारीरिक संबंधांची मागणी केली. आणि तो पुढे म्हणाले 370 रु खर्च केले आहे तिच्यावर वसुल तर मला करायच होत. या विधानामुळे मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला गेला. कारण अश्या गोष्टीमुळे महिलावर जबरदस्ती, आत्याचार होउ शकतात. त्या मुळे या गोष्टीमुळे सगळीकडे प्रंचड संताप व्यक्त केला जात आहे.
हिला काय खायला मिळतं की नाही? माधुरी दीक्षितने सांगितला ट्रोलिंगचा अनुभव
Comments are closed.