मिस्टर इंडिया मधील टीना आता दोन मुलांची आई, 45 व्या वर्षीही दिसते क्यूट – Tezzbuzz

चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपट गाजतात कारण त्यातील कथा आणि कलाकारांच्या अभिनयामुळे, तर कोणत्याही मालिकेत चित्रपटात मुख्य पात्र हे महत्त्वाचं असतं आणि त्यामुळेच ती मत कथा चित्रपट ओळखले जाते. मात्र चित्रपटातील साईड कॅरेक्टर ही तितकेच महत्त्वाच्या असते आणि असे अनेकदा घडते की साईड कॅरेक्टर करूनही त्या कलाकाराला प्रेक्षक लक्षात ठेवतात आणि त्याची प्रशंसा करतात. आशाच एका गाजलेल्या चित्रपटाच्या साईड कॅरेक्टर विषयी जाणुन घेवुयात तर हा चित्रपट म्हणजे 1987 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मिस्टर इंडिया’ आहे. हा त्या काळी प्रचंड गाजला आणि त्यातील अनेक कलाकाराना लोक आजही विसरु शकले नाहीत. तर या चित्रपटात अनेक बालकलाकारांनीही या चित्रपटात काम केले होते. त्यापैकी काहींनी आज चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे, तर काही जण आता प्रसिद्धीच्या झोतातून नाहीसे झाले आहेत यातील एक म्हणजे हुझन खुदाई.

हुझन खुदाईने ‘मिस्टर इंडिया’मध्ये टीनाची भूमिका साकारली होती. टीना (tina)तीच मुलगी होती जिचा बॉम्बस्फोटात मृत्यू होतो. या चित्रपटात हुझनने आपल्या अभिनयाने आणि गोंडस, खळी असलेल्या हास्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, तिच्या अभिनयाची आणि गोडपणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. तर या प्रसिध्दी नंतर ती एक उत्तम अभिनेत्री बनेल,  पण तिने मोठ्या पडद्यापासून, प्रसिद्धीच्या झोतापासून स्वतःला लवकरच दूर केले. हुझन आता मोठी झाली आहे आणि अत्यंत ग्लॅमरस दिसते, पण असे असूनही, तिने इतर चित्रपटात काम केलेले नाही. तर ती आता  वृत्ताकनुसार, तिने मार्केटिंग क्षेत्रात स्वतःचे नाव कमावले आहे.

हुझनने चित्रपटसृष्टी सोडली असली तरी, तिचे जादुई हास्य चाहत्यांच्या अजूनही स्मरणात आहे. हुझन आता लिंटासमध्ये जाहिरात कार्यकारी ॲडव्हर्टायझिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते आणि आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. तर हुझन सध्या अंदाजे 45-46 वर्षांची असेल. पण हुझन यानी साकारलेल्या मिस्टर इंडिया’मध्ये पात्रला आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

11व्या वर्षी नॅशनल अवॉर्ड विजेती, पण नंतर वादांच्या भोवऱ्यात अडकूनही आज OTT क्वीन म्हणून कमबॅक

Comments are closed.