नागेश मोरवेकर आणि आदित्य जी नायर यांच्या सुमधूर आवाजात गणेश वंदना – Tezzbuzz

मराठीमध्ये अशी अनेक गणपती बाप्पाची गाणी आहेत ज्यांचा आवाज गणेशोत्सव काळात घराघरात घुमतो. गणपती बाप्पा म्हणजे कलावंतांचं आराध्य दैवत. अनेकांनी आजवर गणारायावर गाणी केली आहेत. गणेशोत्सवात काही लोकप्रिय गाण्यांची कायम आठवण काढली जाते. गणेशचतुर्थी निमित्त स्मरणरंजनाचा आनंद आणि सुंदर भक्तिमय अनुभुती देणार असचं एक भक्तीगीत आदित्य नायर प्रॉडक्शन तर्फे रसिकांच्या भेटीला आलं आहे.

प्रत्येक आविष्काराचा आरंभ करताना गणेशाला केलेलं वंदन गीत म्हणजेच गण.. सुमारे पंचावन्न वर्षांपूर्वी एकोणीसशे सत्तर साली जेष्ठ गीतरचनाकार हरेंद्र जाधव यांनी आपल्या सिध्दहस्त लेखणीने “आम्ही पुजितो गौरी गणा” ही वंदना लिहिली होती. जवळ जवळ दहाहजाराहून अधिक गीत त्यांनी लिहिली आहेत.

आदित्य नायर प्रॉडक्शनने” आज हा अमूल्य असा गण नव्या स्वरूपात श्रोत्यांसाठी सादर केला आहे.
रसिकांसाठी ‘ व्हिडीओ रूपात हे गीत उपलब्ध झाले आहे.

‘तुला आम्ही पुजितो गौरी गणा”* ही प्रसिद्ध गणेश वंदना अभिनेते आणि गायक नागेश मोरवेकर यांच्या दमदार आवाजात ऐकायला मिळणार आहे. सोबत आदित्य नायर या बालगायकाची सुमधूर साथ त्यांना लाभली आहे. किशोर मोहिते यांचा संगीतसाज या गीताला लाभला आहे.

आदित्य जी नायर ने आधीच भक्तिगीतांच्या जगात आपले स्थान निर्माण केले आहे. यावर्षी त्यांनी सर्वात लहान वयाच्या मुलाने संस्कृतमध्ये गणपती अथर्वशीर्ष गायले आणि रेकॉर्ड केले. त्यांची निष्ठा या वर्षी सादर केलेल्या पारंपरिक “तुला आम्ही पुजितो गौरी गणा” आणि नवकल्पनाशील “विनवितो तुला गौरी नंदना” दोन्ही गीतांमध्ये दिसून येते. “विनवितो तुला गौरी नंदना” ह्या गाण्याची गीतरचना तारका हरेंद्र ह्यांनी केली आहे. ही दोन्ही गाणी आदित्य नायर प्रॉडक्शन्स युट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत.

गणपती बाप्पाचा उत्सव हा आनंद व उल्हासाचे प्रतीक आहे. हा आनंद अधिक द्विगुणित व्हावा यासाठी आणलेली ही वंदना सर्व रसिकांना चैतन्याची अनुभुती देईल असा विश्वास नागेश मोरवेकर आणि आदित्य नायर यांनी व्यक्त केला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

विमानतळावर एकत्र दिसले रश्मिका आणि विजय देवरकोंडा, चाहते झाले खुश

Comments are closed.