अक्षय कुमारने सांगितलं रागात ट्विंकल खन्ना काय करते; हे ऐकून रितेश देशमुख–जेनेलियाला हसू आवरेना – Tezzbuzz
बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार लवकरच नव्या रिअॅलिटी शो ‘द व्हील ऑफ फॉर्च्यून’चा होस्ट म्हणून छोट्या पडद्यावर परतणार आहे. शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन पाहायला मिळणार असून, अभिनेता रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख आणि श्रेयस तळपदे हे खास पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नाबद्दल एक मजेशीर किस्सा शेअर करत सर्वांना हसवलं आहे.
प्रोमोच्या सुरुवातीला अक्षय कुमार रितेश देशमुखला विचारतो, “तुझ्या लग्नाला किती वर्षे झाली?” यावर रितेश सांगतो की त्यांनी जेनेलियाला 10 वर्षे डेट केलं आणि लग्नाला 14 वर्षे झाली आहेत. त्यावर अक्षय म्हणतो की त्याच्या लग्नाला तब्बल 25 वर्षे झाली असून, त्यामुळे पत्नीला ‘सॉरी’ कसं म्हणायचं हे शिकायला हवं. यावर जेनेलिया गंमतीने म्हणते, “पण रितेश तर आधीच ‘सॉरी देशमुख’ आहे.”
यानंतर अक्षय कुमारने (Akshay Kumar)पत्नी ट्विंकल खन्नाबद्दल एक मजेशीर खुलासा केला. तो म्हणाला, “माझी बायको वेगळी आहे. ती जेव्हा माझ्यावर रागावते, तेव्हा मला कसं कळतं माहित आहे? जेव्हा मी झोपायला जातो आणि माझ्या बाजूचं बेड ओलं असतं. कारण तिने तिथे पाणी ओतलेलं असतं.” हा किस्सा ऐकून रितेश आणि जेनेलिया जोरात हसले, तर रितेशने अक्षयला मिठीही मारली.
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा विवाह 17 जानेवारी 2001 रोजी खासगी समारंभात झाला होता. या दोघांना आरव (जन्म 2002) आणि नितारा (जन्म 2012) अशी दोन मुलं आहेत. सोशल मीडियावर हे कपल नेहमीच मजेशीर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतं, ज्यातून त्यांची खास बॉन्डिंग दिसून येते.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर अक्षय कुमारचा रिअॅलिटी शो ‘द व्हील ऑफ फॉर्च्यून’ 27 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर प्रीमियर होणार आहे. याशिवाय, तो दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटातही झळकणार असून, हा सिनेमा 15 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात परेश रावल आणि वामिका गब्बीही प्रमुख भूमिकेत असतील. तसेच, अक्षयकडे ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘हैवान’ हे चित्रपटही आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
Comments are closed.