विकी कौशलने कतरिना कैफच्या बर्थडे निमित्त शेअर केली खास पोस्ट – Tezzbuzz

बॉलिवूड मधील लोकप्रिय जोडप्यापैकी एक जोडी म्हणजे विकी कौशल आणि कतरिना कैफ आहेत. तिचा हा 43 वा वाढदिवस होता तर नुकतच विकी कौशलने आपली पत्नी कतरिना कैफच्या वाढदिवसानिमित्त बर्थडे सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे. या सोबत एक सुंदर कॅप्शन दिले आहे. “जान का जन्मदिन” असे कॅप्शन दिले आहे. ज्यामुळे चाहत्यांनी या जोडप्याच्या सुंदर नात्याचे कौतुक केले.

कतरिना कैफ आणि विकी या पोस्ट केलेल्या फोटो मध्ये खुप सुंदर दिसत आहेत. तिने या क्लासिक निळ्या डेनिम जॅकेट घातला होता जो तिला अतिशय शोभुन दिसत होता. तर विकीने पांढरा शर्ट मध्ये उत्तम दिसत होता.  आणि या विकी तिला मिठी मारली होती.

विकिने केलेल्या या कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या सजावटीमध्ये पांढरे, क्रीम आणि मेटॅलिक सोनेरी रंगाचे आकर्षक  फुगे लावले होते आणि पार्श्वभूमीवर “हॅपी बर्थडे कतरिना” असा बॅनर लावला होता, ज्यामुळे सेलिब्रेशनची शोभा अधिकच वाढली होती.

ही पोस्ट शेअर करताच वेगाने व्हायरल झाली. चाहत्यांनी तसेच सेलिब्रिटींनी कमेंट्सच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करत या जोडप्याच्या केमिस्ट्रीचे कौतुक केले. विकी आणि कतरिना त्यांचे खाजगी आयुष्य गुप्त ठेवण्यासाठी ओळखले जातात, परंतु ते अनेकदा एकत्र घालवलेल्या खास क्षणांची झलक शेअर करून चाहत्यांना आनंद देतात.

विकीच्या (Vicky) कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर काही दिवसांपुर्वी तो ‘छावा’ या चित्रपटात दिसला होता. आणि आता तो रणबीर कपूर व आलिया भट्ट यांच्यासोबत ‘लव्ह अँड वॉर’  तसेच ‘महावतार’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, कतरिना सध्या तिच्या ‘के ब्युटी’ या ब्रँड कसा वाढवावा या वर लक्ष देत आहे.

अक्षयच्या 25 कोटींच्या नोटिशीवर अखेर बोलले परेश रावल, ‘हेरा फेरी’ माझ्यासाठी केवळ चित्रपट नाही…

Comments are closed.