विवियन डिसेनाने दोन महिन्यांनंतर केले पुनरागमन, दुसऱ्या बाळाच्या आनंदाची दिली खुशखबर – Tezzbuzz

विवियन डिसेना हा एक टीव्ही अभिनेता आहे. ज्याने ‘बिग बॉस 18’ मध्ये सहभाग घेतला होता आणि यातुन तो चाहत्यांनाचा आवडता स्पर्धक बनला होता. आणि आता तो त्याच्या एका वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आहे. तर त्याने चाहत्यांना एक खूप खास बातमी दिली आहे. विवियन आणि त्याची पत्नी नौरान अली, यांच्या घरी दुसऱ्या मुलाचे आगमन झाले आहे. विवियन डिसेना हा सोशल मीडिया पासुन बऱ्याच काळ दूर होता. आणि ऐवढ्या कालावधीनंतर तो आता तो हि आंनदाची बातमी शेअर केली. अभिनेत्याने एका हृदयस्पर्शी नोटमध्ये आपला आनंद व्यक्त केला आहे.

विवियन (vivian)डिसेना याने या पोस्टमध्ये लिहिले, “काही कथा जाहीर करण्यासाठी नसतात, त्या जगण्यासाठी असतात. त्या शांततेने खूप काही सांगितले… आमचे साम्राज्य आणखी मोठे झाले आहे… आणि या वेळी, एका राजकुमाराचे आगमन झाले आहे.” विवियनने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘अल्हम्दुलिल्लाह’ असे लिहून देवाचे आभार मानले, आणि स्पष्ट केले की त्याला एक मुलगी असूनही तो आता मुलाचा बाप झाला आहे. विवियनने ही बातमी शेअर करताच, त्याच्या कमेंट्स सेक्शनमध्ये अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला.

विवियन डिसेना हा भारतीय टेलिव्हिजनवरील उत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘कसम से’, ‘प्यार की ये एक कहानी’, ‘मधुबाला: एक इश्क एक जुनून’, ‘शक्ती: अस्तित्व के एहसास की’ आणि ‘सिर्फ तुम’ यांसारख्या सुपरहिट मालिकांमधून त्याने प्रत्येक घराघरात आपले स्थान निर्माण केले आहे. आणि आता तो वडिल झाल्याचा आंनद घेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

OTTची बादशाह ठरलेली 9.2 रेटिंगची हि सिरीज, प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात आहे घर करून

Comments are closed.