फिरोज खानांनीच वेलकमला दिला जीव; १८ वर्षांनिमित्त अनिल कपूर यांनी शेअर केला खास किस्सा – Tezzbuzz
बॉलिवूडमधील गाजलेली कॉमेडी फिल्म ‘वेलकम’ आजही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान राखून आहे. २१ डिसेंबर २००७ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आज तब्बल १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. अक्षय कुमार, अनिल कपूर, नाना पाटेकर, कॅटरीना कैफ आणि दिवंगत फिरोज खान यांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट आजही तितकाच लोकप्रिय आहे. या खास निमित्ताने अभिनेता अनिल कपूर यांनी दिवंगत फिरोज खान यांना भावनिक श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अनिल कपूर (Anil Kapoor)यांनी सोशल मीडियावर ‘वेलकम’मधील काही आठवणी शेअर करत लिहिले की, “‘वेलकम’चे १८ वर्षे पूर्ण झाली. हा चित्रपट फिरोज खान साहेबांसाठी. RDX शिवाय ‘वेलकम’ पूर्णच झाली नसती. जसं मोगॅम्बोशिवाय ‘मिस्टर इंडिया’ अपूर्ण आहे, तसंच. दोघांची जागा कोणीच घेऊ शकत नाही.” त्यांच्या या पोस्टने चाहत्यांच्या भावना स्पर्शून गेल्या.
अनिल कपूर यांनी आणखी एक किस्सा शेअर करत सांगितले की, जेव्हा चित्रपट थोडा अडचणीत अडकला होता, तेव्हा दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी फिरोज खान यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला होता. “स्क्रिप्ट ऐकताना मला वाटलं होतं की पिक्चर इथेच थांबेल. पण अनीस भाई म्हणाले, ‘चिंता करू नकोस, फिरोज साहेब पिक्चर संभाळतील.’ आणि खरंच, RDX ने चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेलं,” असं अनिल कपूर यांनी लिहिलं.
फिरोज खान यांनी साकारलेला RDX हा खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. २००९ मध्ये त्यांचे निधन झाले असले, तरी ‘वेलकम’मधील त्यांची भूमिका आजही अमर आहे.
बॉक्स ऑफिसच्या बाबतीतही ‘वेलकम’ सुपरहिट ठरली होती. सुमारे ४८ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने ७० कोटींहून अधिक कमाई केली होती. २०१५ मध्ये ‘वेलकम बॅक’ हा सिक्वेल आला आणि आता लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ ही तिसरी कडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.१८ वर्षांनंतरही ‘वेलकम’ची जादू कायम आहे, हेच या चित्रपटाचं खरं यश म्हणावं लागेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
करवा चौथसाठी निकने केले खास प्रयत्न; कपिलच्या शोमध्ये प्रियांकाने सांगितला रोमँटिक किस्सा
Comments are closed.