दोन वर्षे रखडलेला अक्षय कुमारचा चित्रपट अखेर पूर्ण, ख्रिसमसला समोर आली खास झलक; २०२६ मध्ये होणार धमाका – Tezzbuzz

बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार यांनी त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’च्या शूटिंग पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. हा चित्रपट सुपरहिट ‘वेलकम’ फ्रँचायझीचा तिसरा भाग असून, चाहत्यांना याची गेल्या दोन वर्षांपासून उत्सुकता होती. सतत पुढे ढकलला जाणारा हा सिनेमा आता अखेर २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar)यांनी स्वतः पोस्ट शेअर करत चाहत्यांना ख्रिसमसचं खास गिफ्ट दिलं आहे.

अक्षयने इन्स्टाग्रामवर एक खास टीझर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटातील स्टारकास्टची झलक पाहायला मिळते. ख्रिसमस जिंगलच्या पार्श्वसंगीतावर सर्व कलाकार एकत्र एंट्री करताना दिसतात. पोस्टसोबत अक्षयने लिहिलं आहे,‘वेलकम टू द जंगल’च्या संपूर्ण टीमकडून तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या मनःपूर्वक शुभेच्छा. हा आमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. शूटिंग पूर्ण झाली असून २०२६ मध्ये हा चित्रपट तुमच्यासाठी सिनेमागृहात घेऊन येण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

या पोस्टमधून अक्षय कुमार यांनी स्पष्ट केलं आहे की ‘वेलकम टू द जंगल’ २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. टीझरमध्ये अक्षय कुमारसोबत रवीना टंडन, सुनील शेट्टी, अरशद वारसी, तुषार कपूर, जॉनी लीव्हर, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस, आफताब शिवदासानी आणि राजपाल यादव एकत्र चालताना दिसतात. सर्व कलाकार प्रोटेक्टिव्ह गियर आणि शस्त्रांसह दिसत असल्याने चित्रपटात अ‍ॅक्शनसोबत जबरदस्त कॉमेडी पाहायला मिळणार असल्याचं संकेत मिळतात.
विशेष म्हणजे, पांढरे लांब केस आणि दाढीतील अक्षय कुमारचा रफ लूक सध्या चांगलाच चर्चेत आहे.

‘वेलकम टू द जंगल’ हा लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. पहिल्या ‘वेलकम’ चित्रपटात अक्षय कुमार, कॅटरीना कैफ, अनिल कपूर, नाना पाटेकर आणि परेश रावल मुख्य भूमिकेत होते. २०१५ मध्ये आलेल्या ‘वेलकम बॅक’मध्ये अक्षय आणि कॅटरीनाच्या जागी जॉन अब्राहम आणि श्रुती हासन झळकले होते. दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले होते.

नव्या भागाचे दिग्दर्शन अहमद खान करत आहेत. या चित्रपटात लारा दत्ता, श्रेयस तळपदे, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राहुल देव यांच्यासह गायक दलेर मेहंदी आणि मीका सिंग देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. सध्या चित्रपटाची कथा आणि अचूक रिलीज डेट गुप्त ठेवण्यात आली आहे, मात्र २०२६ मध्ये प्रेक्षकांना भरपूर हास्य आणि धमाल अनुभवायला मिळणार हे नक्की.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

क्रिसमसच्या दिवशी संपूर्ण जग शोकाकूल झाले, एकही शब्द न बोलता सगळ्यांना हसवणाऱ्या कॉमेडी सम्राटाने डोळे मिटले; नंतर चोरीला गेले पार्थिव

Comments are closed.