8.5 IMDb रेटिंग असलेल्या या मालिकेने भारतीय प्रेक्षकांना लावलं होत वेड, मालिका लागताच सगळी कामे थांबायची – Tezzbuzz
80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. या सिरीयल मुळे अनेक प्रेक्षक आपली हातातले काम सोडून मालिका पाहत असत. जरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे. या दरम्यान एक अशी मालिका आली होती ती प्रेक्षकांना खुप भावली.
ही मालिका म्हणजे ‘हम लोग’ आणि या मालिकेला 7 जुलै 1984 रोजी दूरदर्शनवर प्रसारीत झाली तर या मालिकेचे एकुण 156 भाग दूरदर्शनवर प्रसारित झाले. आणि या भागानी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. हे एक कौटुंबिक नाटक होते, ज्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या समस्या दर्शवल्या होत्या. ही मालिका चैनीच्या वस्तूंऐवजी मूलभूत गरजा आणि कौटुंबिक समस्यांभोवती फिरत होती आणि त्यात मोठी वळणे नव्हती.
‘हम लोग’ ही भारतीय टेलिव्हिजनवरील पहिली दैनिक मालिका होती. या मालिकेची कथा मनोहर श्याम जोशी यांनी लिहिली होती. तसेच दिग्दर्शन पी. कुमार वासुदेव (vasudev)यांनी केले होते. या सुंदर टीव्ही मालिकेचे शीर्षक संगीत संगीतकार अनिल बिस्वास यांनी संगीतबद्ध केले होते. ‘हम लोग’च्या त्याला IMDb वर 8.5 चे रेटिंग मिळाले आहे. तर ही मालिका प्रेक्षकांना त्या काळी खुप भावली होती.
या गाण्याला 2 महिन्यांत मिळाले तगडे व्ह्यूज, यूट्यूबवर ‘धुरंधर 2’च्या गाण्यांनाही टाकलं मागे
Comments are closed.