धुरंधर 2 मधील कॅमिओसाठी यामी गौतमला मोठं मानधन? अभिनेत्री म्हणाली, ‘काही गोष्टी अनमोल असतात – Tezzbuzz

आदित्य धर दिग्दर्शित धुंरधर या चित्रपटातील यामीच्या कॅमिओने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे. चित्रपटाच्या यशानंतर यामीला विशेष तिच्या भुमिकेसाठी रक्कम मिळाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता अभिनेत्रीने या प्ररकणी आता स्पष्ट उत्तर दिले आहे. तिने चित्रपटातील कामासाठी तिला किती रक्कम मिळवली आणि तिच्यासाठी या कॅमिओचे खरे महत्त्व काय हे तिने आता स्पष्ट केले आहे.

यामी (yami)गौतम हि ‘कोण होणार करोडपती’ या मराठी क्विझ शो मध्ये लवकरच पाहायला मिळणार आहे. आणि याचा प्रोमो समोर आला असुन ज्यामध्ये ही अभिनेत्री बॉलिवूड क्वीन माधुरी दीक्षित यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे. या दरम्यान माधुरीने म्हटले मी ‘धुरंधर: द रिव्हेंज’ पाहिला असून तो मला खूप आवडला आहे. त्यानंतर त्याने यामीच्या कॅमिओचा विषय काढला आणि तिला विचारले याचे तुझे मानधन किती होते. तर यामीने यावर रंजक उत्तर दिले, ती म्हणाली की, तिला या कॅमिओसाठी एक मोठा चेक मिळाला होता. हे वाचून तिला स्वतःला आश्चर्य वाटले होते. यामीने स्पष्ट केले की, आणि ती पुढे म्हणाली की, या चित्रपटाचा भाग होणे हे मानधनापुरते नव्हते, काही गोष्टींची किंमत पैशात मोजता येत नाही. मला या चित्रपटाचा भाग होता आला हीच खुप माझ्यासाठी आंनदाची बाब होती.

यामीने पुढे म्हणले की, मी आदित्यला या चित्रपटात हवी होते कारण तो मला त्याच्यासाठी एक शुभचिन्ह मानतो. तसेच यामीच्या मते,  या भूमिकेतून तिला मिळालेले सर्वात मोठे बक्षीस म्हणजे एका प्रतिभावान दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी.

हेही वाचा
नई नवेलीच्या रीलीजपुर्वी यामी गैतम अयोध्येत दाखल, भगवान रामाचे घेतले दर्शन

Comments are closed.