प्रायव्हेट पार्टवर गोळ्या घातल्या, प्रेयसीच्या कुटुंबियांनी युवकाला क्रूरतेने संपवलं, देश हादरल

Uttar Pradesh kasganj Crime : उत्तर प्रदेशातील पटियाली येथील सिकंदरपूर भागात प्रेमप्रकरणातून एका तरुणाची गोळीबार करून हत्या करण्यात आलीये. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या कुटुंबातील मुलीवर प्रेम करतो याचा राग मनात ठेऊन मुलीच्या वडिलांनी आणि भावांनी मिळून प्रियकर असलेल्या अंकुरची क्रूरपणे हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकरणी हत्या झालेल्या अंकुरच्या भावाने पोलिसात तक्रार दिलीये.

अधिकची माहिती अशी की,  कासगंजमधील  येथील सिकंदरपूर वैश्य परिसरात प्रेमप्रकरणातून 20 वर्षीय अंकुर या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. नरडोली गावातील रहिवासी अंकुर सोमवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास शेतात जनावरे राखण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. सकाळी, त्याचे मोठे भाऊ कुलदीप आणि राजीव शेतातून परतले तेव्हा अंकुर कुठेच दिसला नाही. दरम्यान तो कुठेच सापडत नसल्याने भावांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर त्यांना गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली.

संशय आल्याने कुटुंबातील सदस्य तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि भावाचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला. मृतदेहाची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आणि पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अंकिता शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजेश भारती आणि क्षेत्र अधिकारी राज कुमार पांडे हेही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण केले.

मृत अंकुरकडे असलेले साहित्य वाटेत वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आढळले. आधी सायकल सापडली, नंतर टॉवेल आणि काही अंतरावर घड्याळ सापडले. हे साहित्य पाहून कुटुंबातील सदस्य पुढे सरकले आणि मृतदेहाजवळ पोहोचले. दरम्यान, अंकुरला अतिशय क्रूरपणे संपवण्यात आले आहे. त्याच्या प्रायव्हेट पार्टवर गोळीबार करण्यात आलय. याशिवाय, त्याचा चेहरा देखील विद्रुप करण्यात आला होता.  अंकुर सहसा शेत सांभाळण्यासाठी जायचा आणि त्याचे वडील राम सेवक रात्री गोठ्यात राहायचे. मात्र, घटनेच्या रात्री राम सेवक त्यांचा मोठा मुलगा किशनवीरसोबत एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी गेला होता, त्यामुळे अंकुर शेतावर जाण्यासाठी घरातून एकटाच निघाला होता. अंकुरच्या भावाने  सांगितले की, अंकुरचे शेजारच्या गावातील एका मुलीशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुमारे एक वर्षापूर्वी, मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते, त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबाने अंकुरला गावाजवळ दिसल्यास त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती.

इतर महत्त्वाच्या बातम्या

पवारसाहेब नेता बनवणारी फॅक्टरी, त्यांनी सांगितलं तर हिमालयावरुनही उडी मारेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

अधिक पाहा..

Comments are closed.