व्ही-बॅट कॉम्बॅट ड्रोन भारतात तयार केले जावे
अमेरिकेच्या कंपनीसोबत करार होणार : तंत्रज्ञान हस्तांतरण संबंधी होतेय चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत अत्याधुनि ड्रोन खरेदी करण्याच्या तयारीत आहे. याकरता भारत वी-बॅट कॉम्बॅट ड्रोनच विचार करत असून याची निर्मिती अमेरिकन संरक्षण कंपनी शील्ड एआयकडून केली जाते. अमेरिकन ड्रोन खरेदीचा क्यवहार 4.5 अब्ज डॉलर्सच्या तातडीच्या खरेदी अंतर्गत होत आहे. ड्रोन तंत्रज्ञानात भारत आघाडीवर असला तरीही लढाऊ ड्रोनची आवश्यकता असल्याने अमेरिकन कंपनीच्या उत्पादनाची निवड केली जाणार आहे. यासंबंधीचा करार झालयास हा कॉम्बॅट ड्रोन लवकरच भारतात निर्माण केला जाणार आहे. कारण शील्ड एआयसोबत तंत्रज्ञान हस्तांतरणाची देखील चर्चा होत आहे.
संरक्षण मंत्रालयाची शील्ड एआयसोबत कॉम्बॅट ड्रोनसंबंधी चर्चा सुरू आहे. भारतीय वायुदल शील्ड एआयकडून व्ही-बॅट कॉम्बॅट ड्रोन खरेदी करू इच्छित आहे. हा ड्रोन युद्धात वापरला जाणार असून आतापर्यंत या ड्रोनने अत्यंत प्रभावी कामगिरी करून दाखविली आहे. करारावर शिक्कामोर्तब झाल्यावर शील्ड एआय भारतीय वायुदलाला अत्याधुनिक लढाऊ ड्रोन पुरविणार आहे तसेच संयुक्त प्रकल्पात याची भारतातच निर्मिती केली जाणार आहे. जेएसडब्ल्यू डिफेन्स आणि शील्ड एआयच्या संयुक्त उपक्रमात या ड्रोनची भारतात निर्मिती करण्याची योजना आहे.
देशात लढाऊ ड्रोन निर्मितीची तयारी
भारतीय वायुदल याकरता अमेरिकेच्या कंपनीसोबत प्रारंभिक काळात 35 दशलक्ष डॉलर्सचा करार करणार आहे. आपत्कालीन खरेदी व्यवस्थेत ही कमाल मर्यादा आहे. तर जेएसडब्ल्यू डिफेन्स आणि शील्ड एआय याच्या भारतात निर्मितीसाठी संयुक्त प्रकल्प उभारणार असून याकरता पुढील काळात 90 दशलक्ष डॉलर्सचा करार होणार आहे. त्यानंतर वायुदलासोबतच्या या व्यवहाराचा आणखी विस्तार होऊ शकतो.
ऑपरेशन सिंदूरनंतर वाढली आवश्यकता
शील्ड एआय आणि संरक्षण मंत्रालयादरम्यान करार झाल्यास पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत हा ड्रोन भारतीय वायुदलाला मिळू शकतो. तर 2027 च्या अखेरपर्यंत भारतात या प्रकारच्या ड्रोन्सची निर्मिती सुरू होण्याची शक्यता आहे. अमेरिकन कंपनी संरक्षणाच्या क्षेत्रात अशाप्रकारचा संयुक्त प्रकल्प भारतात उभारण्यास तयार झाल्यास संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रातील ही एक मोठी कामगिरी मानली जाऊ शकते. कारण ऑपरेशन सिंदूरनंतर भारताला संपर्करहित युद्धाच्या तयारीची मोठी गरज भासत आहे. याकरता लढाऊ ड्रोन्ससोबत लोइटरिंग म्युनिशन, अल्ट्रा-हाय रेझोल्यूशन, विनाअडथळा उपग्रहाद्वारे देखरेख व्यवस्थेची आवश्यकता वाढली आहे.
वी-बॅट कॉम्बॅट ड्रोन खास का?
शील्ड एआयचा वी-बॅट कॉम्बॅट ड्रोन हा जीपीएसशिवाय वापरला जाऊ शकतो, याचबरोबर जाम करण्यात आलेल्या नेटवर्क सिस्टीमध्येही हा काम करण्यास सक्षम आहे. यामुळे आधुनिक युद्धात हा ड्राने वापरणाऱ्यांना सहजपणे आघाडी मिळू शकते. या ड्रोनचा वापर रशियाच्या विरोधात करत युक्रेनने पूर्ण जगाला चकित करून सोडले आहे. हा ड्रोन अत्यंत अचूक निशाणा भेदू शकतो. सध्या भारतात निर्माण होणाऱ्या ड्रोन्समध्ये इतकी अचूकता नाही. भारतात सध्या आयडिया फोर्ज आणि डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन स्वदेशी ड्रोन तयार करत आहे.
Comments are closed.