वाढवण संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश, स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाढवणवासीयांना चिरडणाऱ्या बंदराविरोधात ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहण्याचे दिलेले वचन, या बंदराविरोधात उभारलेल्या लढ्यात शिवसेनेने दिलेली साथ यामुळे आज वाढवण बंदर संघर्ष समितीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवणारच, असा निर्धार त्यांनी केला.
ग्रामस्थांचा विरोध असतानाही केंद्र सरकारने बंदराचे काम सुरू केले आहे. या लढ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष वाढवणवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. शिवसेनेचे माजी आमदार व पालघर जिल्हा संपर्कप्रमुख विलास पोतनीस तसेच पालघर जिल्हा यंत्रणा प्रमुख उपनेते अमोल कीर्तिकर यांच्या उपस्थितीत आज वाढवण बंदर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
वाढवण बंदर संघर्ष समिती व राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पाटील, वाढवणचे उपसरपंच हरेश्वर पाटील, निशांत राऊत, पुष्पा कडू, नरेंद्र पाटील, रजनी पाटील, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, मनीष पाटील, हितेंद्र पाटील, प्रतीक्षा पाटील, पुष्पा पाटील, माजी सरपंच हेमा पागी आणि संघर्ष समितीच्या वाढवणमधील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. विलास पोतनीस व अमोल कीर्तिकर यांनी या सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी उपनेते उत्तम पिंपळे, सहसंपर्कप्रमुख विकास मोरे, जिल्हाप्रमुख गिरीश राऊत,
अनुप पाटील, पालघर विधानसभा समन्वयक
तुषार पाटील, महिला लोकसभा समन्वयक भावना किणी, तालुकाप्रमुख जितेंद्र पामाळे, शहरप्रमुख भूषण संखे, शहर समन्वयक सुनील महेंद्रकर, युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष मिलिंद राऊत, शाखाप्रमुख राहुल पाटील, उपशाखाप्रमुख सागर कडू, शहर युवा अधिकारी प्रतीक पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रवेशामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला वाढवण परिसरात संघटनात्मक बळ मिळणार आहे. वाढवणमधील राजकारणाला नवी कलाटणी मिळाली असून पुढील काळात या बदलाचे स्पष्ट परिणाम दिसून येणार आहेत, असा विश्वास संपर्कप्रमुख विलास पोतनीस यांनी विश्वास व्यक्त केला.
Comments are closed.