वैभव सुर्यवंशीने शतकी खेळीनंतर पहिला कॉल केला 'या' व्यक्तीला!

राजस्थान रॉयल्समध्ये सामील असलेल्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने सोमवार 28 एप्रिल रोजी राजस्थानसाठी 101 धावांची शानदार शतकी पारी खेळली. यानंतर वैभवने त्याच्या वडिलांना फोन केला. त्यांनी मुलाच्या यशाबद्दल राजस्थान रॉयल्स मॅनेजमेंटला क्रेडिट दिले आहे.

वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्स विरुद्ध फक्त 35 चेंडूत शतक झळकावले. जे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगाने झळकावलेले दुसरे शतक आहे. वैभवचे वडील म्हणाले, वैभवने 35 चेंडूत शतक झळकावून त्याच्या संघाला म्हणजेच राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला. त्याच्या या यशासाठी आम्ही खूप आनंदी आहोत. तसेच पूर्ण परिवारासोबत जिल्हा, बिहार आणि पूर्ण देश सुद्धा आनंदी आहे.

वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले, दिवाळी सहा महिने आधीच आली. आमच्या घरात सणासारखे वातावरण निर्माण झाले आहे. वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी सुद्धा क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत.

त्यानंतर ते म्हणाले, वैभवच्या यशासाठी आम्ही राजस्थान रॉयल्स आणि पूर्ण व्यवस्थापनाला मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांनी तीन-चार महिन्यापासून वैभवला त्यांच्यासोबत ठेवून त्याच्या खेळामध्ये परिवर्तन घडवून आणले आहे. वैभव खूप मेहनत करत होता आणि त्याच्याच परिणामामुळे त्याने काल शतक झळकावले.

त्यांनी राजस्थान रॉयल्सचे हेड कोच राहुल द्रविड यांच्यासोबत सपोर्ट स्टाफ आणि बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश तिवारी यांनाही धन्यवाद दिले.

ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर वैभव सूर्यवंशीने त्याच्या वडिलांना फोन केला होता, ज्याचा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने त्यांचा सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

14 वर्षांच्या वैभवने आयपीएलमध्ये त्याच्या तिसऱ्या सामन्यात शतक झळकावले. त्याने पदार्पणाच्या सामन्यात 34 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात तो 16 धावा करू शकला. तर तिसऱ्या सामन्यात शतकी कामगिरी केली. वैभवला राजस्थानने मेगा लिलावात 1.1 करोड रुपयांना खरेदी केले होते.

Comments are closed.