'वैभव सूर्यवंशीने आम्हाला त्याची निवड करण्यास भाग पाडले', मुख्य निवडकर्ता अजित आगरकरांनीही केले मान्य

युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या दमदार कामगिरीने भारतीय वरिष्ठ संघात प्रवेश केला आहे. या १५ वर्षीय खेळाडूची आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी२० मालिकांसाठी निवड झाली आहे. तसेच त्याला एशियन गेम्स २०२६ साठीही संघात निवडले आहे. त्यामुळे तो भारतीय संघात निवड झालेल्या सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे.

वैभवने आयपीएल २०२६ मध्ये अनेक जागतिक दर्जाच्या गोलंदाजांविरुद्ध चांगली कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्याने या स्पर्धेच्या १६ सामन्यांत २३७.३० च्या स्ट्राईक रेटने ७७६ धावा केल्या आणि ऑरेंज कॅप जिंकली. भारताचे मुख्य संघनिवडकर्ते अजित आगरकर यांनीही त्याची निवड करताना सत्य मान्य केले की, त्याच्या सनसनाटी कामगिरीमुळे त्याची निवड करण्यास आम्हाला भाग पाडले.

संघनिवड झाल्यानंतर आगरकरांनी शनिवारी (६ जून) पत्रकारांची संवाद साधला. त्यामध्ये ते म्हणाले, “वैभवबद्दल आपण काय बोलू शकतो? तो काय करू शकतो, हे आपणा सर्वांना माहितच आहे. त्याने एकहाती राजस्थान रॉयल्सला प्लेऑफपर्यंत पोहोचवले आहे. हे केवळ एका हंगामापुरतेच महत्त्वाचे नाही, त्याने मागील हंगामातही चांगली कामगिरी केली होती. आयपीएलसारख्या स्पर्धामध्ये दबावाखाली चांगली कामगिरी करत त्याची कारकिर्द बदलणारे ठरले. त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे.”

“वैभवने चांगली कामगिरी केली. त्याने आम्हाला निवडायला भाग पाडले आहे. मला त्याचे वय माहित आहे. तो खूपच तरुण आहे आणि नुकतीच त्याच्या कारकिर्दीला सुरूवात झाली आहे. १९ वर्षाखालील आणि आयपीएलमध्ये त्याने जी कामगिरी केली, ती कदाचित आयपीएल किंवा वरिष्ठ क्रिकेटमध्ये त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या कामगिरीपेक्षा थोडी कमी होती, मात्र त्याच्यामध्ये असलेली प्रतिभा सर्वांनीच पाहिली आहे. आम्हाला आशा आहे की जेव्हा त्याला आपल्या देशासाठी खेळण्याची संधी मिळेल, तेव्हा तोच तीच क्षमता दाखेवल”, असेही आगरकरांनी पुढे म्हटले आहे.

आशियाई क्रीडा (एशियन गेम्स) स्पर्धांसाठी भारताचा संघ –
श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह.

इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्याच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया –
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, वैभव सूर्यवंशी, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव.

Comments are closed.