वादळ येतंय… ICC कडून वैभव सूर्यवंशीला ग्रीन सिग्नल, आता विराट अन् रोहितसोबत टीम इंडियात खेळणा
वैभव सूर्यवंशी 15 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा: आयपीएल 2026 सुरू (IPL 2026) होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आज 15 वर्षांचा झाला. आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासूनच चाहत्यांमध्ये एकच चर्चा होती, तो भारताच्या वरिष्ठ पुरुष संघात कधी संधी मिळवणार? आता 15 वर्षांचा झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियमांनुसार तो वरिष्ठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी पात्र ठरला आहे.
मित्रांसाठी काय नियम आहे? (वैभव सूर्यवंशी यांना १५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा)
आयसीसीच्या नियमांनुसार, एखाद्या खेळाडूने राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी किमान 15 वर्षांचे असणे आवश्यक आहे. खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेता आयसीसीने हा नियम बनवला होता. 15 वर्षानंतर खेळाडू मानसिक आणि शारीरिक रुपात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आव्हानासाठी तयार होतील, असे आयसीसीला वाटले. नोव्हेंबर 2020 पासून हे नियम लागू करण्यात आले, जेणेकरून अल्पवयीन खेळाडूंची शारीरिक आणि मानसिक सुरक्षितता सुनिश्चित होईल.
आयपीएल 2025 मध्ये वैभव सूर्यवंशीचा धमाका (Vaibhav Suryavanshi IPL 2025)
वैभव सूर्यवंशीने 2025 मधील आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामात तुफानी कामगिरी करत संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. राजस्थान रॉयल्सने त्याला तब्बल 1.1 कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले आणि त्यानेही अपेक्षांवर खरा उतरून दाखवले. विशेष म्हणजे, आयपीएलमधील फक्त दुसऱ्याच सामन्यात त्याने अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावत आपली क्षमता सिद्ध केली.
त्याची ही झेप अचानक नव्हती. अवघ्या 12व्या वर्षीच तो मोठ्या वयोगटातील गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत होता. मात्र वयोमर्यादेमुळे त्याला वरिष्ठ स्तरावर संधी मिळू शकली नव्हती. पण आता परिस्थिती बदलली आहे. 2026 च्या अंडर-19 विश्वचषकातील चमकदार कामगिरी, तसेच 2025-26 च्या विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीतील सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे तो निवडकर्त्यांच्या नजरेत आला आहे.
वयाची अट पूर्ण, टीम इंडियात करणार पदार्पण? (Vaibhav Suryavanshi IPL 2026)
आता वयाची अट पूर्ण झाल्यामुळे, आयपीएल 2026 संपल्यानंतर त्याच्या भारताच्या वरिष्ठ संघात पदार्पणाची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः कसोटी संघ सध्या संक्रमणाच्या टप्प्यात असल्याने, त्याच्याकडे गंभीरतेने पाहिले जाऊ शकते. पुढील काळात 2028 ऑलिम्पिक आणि टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर, वैभव सूर्यवंशी भारतासाठी एक मोठा गेम-चेंजर ठरू शकतो. एकदिवसीय संघाबाबत मात्र 2027 च्या विश्वचषकापर्यंत सध्याच्या अनुभवी खेळाडूंवरच भर राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.