15 वर्षांच्या पोरावर IPLचा चेअरमन फिदा! बीसीसीआयकडे वैभव सूर्यवंशीसाठी धाडला मेसेज, नेमकं काय क
अरुण धुमाळ ऑन वैभव सूर्यवंशी : आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आपल्या स्फोटक फलंदाजीने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहेत. वैभवच्या या धडाकेबाज कामगिरीने आयपीएलचे चेअरमन अरुण धूमल देखील प्रचंड प्रभावित झाले आहेत. इतकंच नाही, तर त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळकडे वैभवला थेट टीम इंडियात संधी देण्याची मागणीही केली आहे. त्यामुळे आता मोठा प्रश्न उभा राहतोय, या मागणीनंतर भारतीय क्रिकेट बोर्ड नेमकं काय निर्णय घेणार?
राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीने नुकत्याच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात रन चेस करताना अविश्वसनीय खेळी केली. त्यांनी फक्त 26 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांच्या जोरावर 78 धावा ठोकल्या. त्यांच्या या खेळीत स्ट्राइक रेट तब्बल 300 होता. विशेष म्हणजे त्यांनी जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांसारख्या अनुभवी गोलंदाजांनाही चांगलंच धूळ चारलं.
IPL चेअरमन काय म्हणाले?
अरुण धूमल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वैभवचं कौतुक केलं. त्यांनी लिहिलं की, “वैभव सूर्यवंशी आयपीएल 2026 मध्ये अप्रतिम फलंदाजी करत आहे. त्याच्या कामगिरीवरून तो टीम इंडियासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू होण्यास पात्र आहे.”
किशोरवयीन मुलाची आणखी एक चमकदार खेळी 🫡
वैभव सूर्यवंशी याला 26 चेंडूत 78 धावा केल्याबद्दल सामनावीर म्हणून गौरवण्यात आले 🌟
त्याच्या खेळीला पुन्हा जिवंत करा ▶️ https://t.co/gsSXi2CeAe#TATAIPL | #खेळबिंदास | #RRvRCB | @rajasthanroyals pic.twitter.com/J67GEbDY9x
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 10 एप्रिल 2026
सध्या भारताकडून सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने अवघ्या 16 व्या वर्षी भारतासाठी पदार्पण केलं होतं. धूमल यांनी पुढे असंही म्हटलं की, “इतक्या कमी वयात एवढी प्रतिभा क्वचितच पाहायला मिळते. त्यामुळे त्याला ही संधी मिळायलाच हवी.”
IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपवर कब्जा
वैभव सूर्यवंशी सध्या आयपीएल 2026 मध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. चार सामन्यांतील चार डावांत त्याने 50 च्या सरासरीने आणि तब्बल 266.67 च्या स्ट्राइक रेटने 200 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून 2 अर्धशतकं झळकली आहेत. फक्त धावाच नाही, तर वैभवचा आक्रमक अंदाजही तितकाच प्रभावी आहे, आतापर्यंत त्याने 18 चौकार आणि 18 षटकार ठोकत प्रतिस्पर्धी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली आहे. आता बीसीसीआय त्याच्यावर कितपत विश्वास दाखवते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.