14 वर्षांचा 'सिक्सर किंग'! वैभव सूर्यवंशीने IPL मध्ये ठोकले इतके षटकार, आकडे पाहून व्हाल थक्क
सध्या आयपीएल 2025चा रोमांचक सुरू आहे. या हंगामात अनेक जुने रेकाॅर्ड तुटले, अनेक नवे रेकाॅर्ड्स बनले. दरम्यान 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आयपीएलचया इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सच्या (RR) वैभवने फक्त 35 चेंडूत 100 धावांचा टप्पा पूर्ण केला. आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. वैभवच्या पुढे फक्त ख्रिस गेल (Chris Gayle) आहे, ज्याने फक्त 30 चेंडूत शतक झळकावले आहे.
वैभव सूर्यवंशीने त्याच्या ऐतिहासिक शतकी खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वैभवने आतापर्यंत राजस्थानसाठी 4 सामने खेळले आहेत. या 4 सामन्यांमध्ये त्याने 50.33च्या सरासरीने 151 धावा केल्या आहेत. यापैकी 101 धावा वैभवने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात केल्या. वैभवने 151 धावा करताना 16 षटकार आणि 9 चौकार मारले आहेत.
वैभवच्या खेळाने खूश होऊन राजस्थान रॉयल्सचे मालक रणजित बरठाकूर यांनी या 14 वर्षीय खेळाडूला मर्सिडीज कार भेट दिली. वैभवच्या शतकामुळे केवळ संघ मालकच नाही तर इतर सर्वांच आश्चर्यचकित झाले. बिहार राज्याच्या नितीश कुमार सरकारने वैभवला 10 लाख रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले. वैभव सूर्यवंशीच्या दमदार खेळीमुळे अनेक क्रिकेट दिग्गजांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या.
Comments are closed.