GT vs RR: 14 वर्षांचा विक्रमवीर! वैभव सूर्यवंशीने IPL मध्ये रचला नवा इतिहास!

यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL 2025) 47व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान राॅयल्स आमने-सामने आहेत. दरम्यान राजस्थान टाॅस जिंकून गुजरातला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. यावेळी शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातने निर्धारित 20 षटकात 209 धावा केल्या. दरम्यान धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला.

209 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान राॅयल्सने धमाकेदार सुरूवात केली आहे. राजस्थानसाठी यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी सलामी दिली. दोघंही पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक खेळत होते. यावेळी राजस्थानचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा तरूण खेळाडू ठरला. (Vaibhav Suryavanshi Created a History)

वैभव सूर्यवंशीने अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावले. तसेच तो यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू ठरला.

Comments are closed.